घरताज्या घडामोडीबदल्या सुरूच! राज्यात ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!

बदल्या सुरूच! राज्यात ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Subscribe

एकीकडे कंगना रनौत आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच या गोंधळात राज्य सरकारने बदल्यांचं सत्र सुरूच ठेवलं असून राज्यातल्या अजून ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये बहुचर्चित अशी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बदल्यांचं राजकारण केलं जात असल्याचे आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. मात्र, त्याला न जुमानता राज्य सरकारने बदल्या करणं सुरूच ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बदल्या करणं हा राज्य सरकारचा अधिकारच आहे’, अशी ठाम भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मांडली होती.

कुणाची कुठे झाली बदली?

१) किशोर राजे निंबाळकर, सचिव मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याच पदावर काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. ती रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

२) एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

३) ई. रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

- Advertisement -

४) मनुकुमार श्रीवास्तव यांची बदली मंत्रालयात अपील आणि सुरक्षा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर सीताराम कुंटे यांच्याकडे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार राहणार आहे.

५) कैलाश शिंदे यांची बदली नवी मुंबई सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -