घरमुंबईवसई परिवहन कर्मचार्‍यांच्या ‘काम बंद’मुळे प्रवाशांचे हाल

वसई परिवहन कर्मचार्‍यांच्या ‘काम बंद’मुळे प्रवाशांचे हाल

Subscribe

ठेकेदार दर महिन्याला वेळेवर पगार देत नसल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन कर्मचार्‍यांनी बुधवारी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे परिवहन सेवा ठप्प झाली आहे. बसगाड्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. संध्याकाळपर्यंत तोडगा न निघाल्याने संप सुरूच होता. महापालिकेची परिवहन सेवा ठेका पद्धतीने चालवली जाते. कामगारही ठेका पद्धतीवर काम करतात. सुमारे 700 ठेका कर्मचारी आहेत. त्यांना दर महिन्याच्या 10 तारखेला नियमित पगार दिला जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

याही महिन्यात पगार वेळेत दिला नाही तर काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही 14 तारीख उलटून गेल्यानंतर पगार न मिळाल्याने 15 तारखेला सकाळपासून सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे शहरातील सर्व बसेस बंद होत्या. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. पर्यायी व्यवस्था नसल्याने रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू होती.

- Advertisement -

संध्याकाळपर्यंत कोणत्याही तोडगा निघाला नव्हता. पगार दरमहा वेळेत मिळाला पाहिजे अशी मागणी असल्याचे संघटनेचे सांगत होते. प्रशासन बोलणी करीत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. सर्व कर्मचार्‍यांना पगार दिला गेला आहे. तरीही कर्मचारी संघटना चर्चा न करता संपावर अडून असल्याने तोडगा निघत नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोघांच्या वादात प्रवासी भरडला जात आहे.

सर्व कर्मचार्‍यांचे पगार दिले आहेत. पगारवाडीसाठी कर्मचारी संघटना आग्रही आहे. चर्चा सुरू आहे. मार्ग निघेल.
—प्रितेश पाटील, सभापती, परिवहन, वसई विरार महापालिका

- Advertisement -

नियमित 10 तारखेला पगार मिळाला पाहिजे. पगारवाढीचा विषय कोर्टात आहे. त्यावर आम्ही बोलत नाही. प्रशासन किंवा ठेकेदार बोलणी करीत नाही.
—पुतळाजी कदम, जनरल सेक्रेटरी, श्रामजीवी कामगार संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -