डंपरची ट्रॉली तुटल्याने कळवा नाक्यावर ट्रॅफिक जाम!

Mumbai

कळवा – नवी मुंबई मार्गावर आज सकाळी ९ च्या सुमारास एक विचीत्र अपघात घडला. कळवा – नवी मुंबई मार्गावरील कळवा नाका येथे सध्या नवीन पुलाचे काम सुरू आहे. आज सकाळी एक डंपर या पुलाखालून जात असताना अचानक त्याच्या ट्रॉलीचे लॉक तुटले. यामुळे डंपरचं ड्रायव्हर केबिन आणि ट्रॉली यांच्यात फूट पडली आणि ट्रॉली थेट उलटून पुलाखाली अडकली. दरम्यान, या अवस्थेत हा डंपर पुलाखाली अडकून राहिल्यामुळे कळवा नाक्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती.


वाचा : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या

आज सकाळी नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हा डंपर ज्यावेळी कळवा नाका येथे पोहचला, त्यावेळी नवीन पुलाखालून जात असताना अचानक त्याच्या ट्रॉलीचे लॉक तुटले. ट्रॉली पुलाखाली अडकून राहिल्यामुळे डंपर पुलाखालून बाहेर काढण्यास अडचण येत होती. रविवारच्या सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना या अपघातामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, ट्रॉलीचा धक्का लागल्यानंतर नवीन पुलाचे काही नुकसान झाले आहे की नाही, याचा तपास संबंधित विभागाचे अधिकारी करत आहेत.