गणपतीच्या विसर्जन मार्गात पुलकोंडी

मागील काही दिवसांपासून भक्तांचा पाहुणचार घेणार्‍या श्री गणरायाला आता निरोप द्यायची वेळ जवळ आली आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशीला घरोघरी तसेच मंडळांमध्ये विराजमान झालेल्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने केले जाणार आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत बाप्पांच्या मिरवणुका निघणार आहेत. मात्र या मिरवणुकांना पुल कोंडीचा त्रास होणार आहे. विसर्जन मार्गातील रेल्वेवरील १६ पूल ही धोकादायक असून या पुलांवरून विसर्जन मिरवणुकातील लोकांना गटागटाने पुलावरून पाठवून, पुलाच्या खाली उतरताच मिरवणुकीचा आनंद लुटता येणार आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील १६ पूल धोकादायक झाल्याने त्यावर १६ टनापेक्षा अधिक भार पेलला जाणे शक्य नाही. त्यामुळे पूल बंद करण्याचा निर्णय महापालिका व रेल्वेने घेतला होता. परंतु गणेश मंडळांची विनंती लक्षात घेता हे पूल गणेश मिरवणुकीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरुन विसर्जनासाठी जाताना गटागटाने जावे, जेणेकरून पुलावर एकचवेळी १६ टनापेक्षा अधिक वजन होणार नाही, असे आवाहन महापलिका व रेल्वे प्रशासनाने केले आले. पुलावर ध्वनिक्षेपक लावून नाचगाणी करू नये, पुलावरून खाली उतरल्यावर आनंद घ्यावा. तसेच पुलावर जास्त वेळ थांबू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

या पुलावंर गणेश भक्तांना घ्यावी लागणार काळजी
घाटकोपर रेल्वे पूलकरी रोड रेल्वे पूल
चिंचपोकळी रेल्वे पूलभायखळा रेल्वे पूल
मरीन लाइन्स रेल्वे पूल
ग्रँट रोड – फेरर रेल्वे पूल
सँडहस्टर्ड रेल्वे पूल( ग्रँट रोड ते चर्नीरोड मधील)
फ्रेंच रेल्वे पूल( ग्रँट रोड ते चर्नी रोडमधील)
केनेडी रेल्वे पूल( ग्रँट रोड ते चर्नी रोडमधील)
फॉकलंड रेल्वे पूल( ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रलमधील)
बेलासिस रेल्वे पूल, मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ
महालक्ष्मी स्टील रेल्वे पूल
प्रभादेवी-कॅरोल रेल्वे पूल
दादर टिळक रेल्वे पूल
वीर सावरकर रेल्वे पूल(गोरेगाव व मालाड मधील)
बोरीवली सुधीर फडके रेल्वे पूल
दहिसर रेल्वे पूल
सांताक्रुझ मिलन रेल्वे पूल
विलेपार्ले रेल्वे पूल
अंधेरी गोखले रेल्वे पूल