घरमुंबईठाण्यातील सॅटीसला गळती प्रवाशांना त्रास

ठाण्यातील सॅटीसला गळती प्रवाशांना त्रास

Subscribe

ठाणे शहरातील पहिला स्मार्ट प्रकल्प असा दावा करण्यात येणार्‍या ठाणे सॅटीस प्रकल्पाचे छत गळू लागले असून त्याखालून दररोज ये-जा करणार्‍या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खरेतर गेल्याच वर्षी या प्रकल्पाला गळती लागली होती. मात्र देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने यंदा गळतीचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी ताडपत्री आणि प्लास्टिक लावून गळती रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे गळती काही थांबत नाही. महापालिकेचे या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील वाहतूक सुधारणा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या सॅटीस प्रकल्पावर छत टाकण्यात आल्यामुळे प्रवाशांचे पावसापासून संरक्षण झाले आहे. परंतु सॅटीस प्रकल्पाच्या खाली मात्र सगळे पावसाचे पाणी एकाच ठिकाणी बाहेर टाकण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांचा सॅटीसखालील प्रवास त्रासदायक झाला आहे. अत्याधुनिक छत उभारल्यानंतरही सॅटीस खाली पाणी झिरपण्याचा प्रकार सुरू असून तो रोखण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत.

- Advertisement -

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गळीत लागल्यामुळे येथील स्थानिकांनी या भागात प्लॅस्टिक लावले होते. वर्षभरामध्ये आणि पावसाळ्यापूर्वीही दुरुस्ती कामे न केल्यामुळे सॅटीसची गळती यंदाही कायम आहे. मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी खाली कोसळत असून खाली पडल्यानंतरही ते आसपास उडत असल्याने घाईने स्थानकात ये-जा करणार्‍या प्रवाशांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.

दोन वर्षांपूर्वी सॅटीस प्रकल्पाचा विकास एअरपोर्ट लॉबीच्या धर्तीवर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. खाजगी वाहतूक आणि रिक्षा वाहतुकीला वेगवेगळ्या मार्गिका देण्यात आल्या. तसेच सॅटीस खालील पार्किंगही बंद करण्याचे ठरले होते. त्यासाठी ठिकठिकाणी अडथळेही टाकण्यात आले आहे. मात्र त्याने फारसा फरक पडलेला दिसत नाही. या भागात अजूनही अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -