घरमुंबईआपात्कालीन परिस्थितीत काय कराल?; केईएमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

आपात्कालीन परिस्थितीत काय कराल?; केईएमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Subscribe

आग, इमारत कोसळणे,  पूर, बॉम्बस्फोट यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे. नायर हॉस्पिटलपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता केईएमच्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं गेलं.

आपात्कालीन परिस्थितीत डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावं? एखाद्या घटनेतील रुग्णांना त्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांना कसं सांभाळावं? अचानक आगीची घटना घडली तर ती आग विझवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे शिवाय ती कशी विझवायची? या सर्व आपात्कालीन परिस्थितीचे धडे पालिकेच्या नायर हॉस्पिटलनंतर आता केईएमच्या कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहेत.

डॉक्टर, नर्ससह संपूर्ण स्टाफला दिले प्रशिक्षण

एखादी घटना घडली की हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाचीच धावपळ होते. हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांसोबत नव्याने येणाऱ्या रुग्णांची काळजी आणि त्यांना तात्काळ उपचार, शस्त्रक्रिया अशा सर्वच महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे, पालिकेच्या आपात्कालीन विभागाच्या वतीने मंगळवारी हे प्रशिक्षण हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स, स्टाफ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना दिलं गेलं. आग, इमारत कोसळणे,  पूर, बॉम्बस्फोट यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे. नायर हॉस्पिटलपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता केईएमच्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं गेलं. आपात्कालीन परिस्थितीत उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर कसा करावा? प्रथमोपचार, काय करावे आणि काय करू नये? या बाबींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली गेली.

- Advertisement -

आपात्कालीन परिस्थितीत योग्य मदत व्हावी

आपल्या इथे एखाद्या घटनेला हाताळण्यासाठी मुंबईकर पटकन प्रतिसाद देतो. पण, तात्काळ मदत करण्याच्या नादात ती मदत योग्य पद्धतीने होते आहे का? याचं ज्ञान त्यांना नसतं. त्यामुळे या दोन्ही प्रतिसादाचं महत्त्व मोठं असल्याचं आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या चमूतील महापालिका कर्मचारी राजेंद्र रामचंद्र लोखंडे यांनी सांगितलं.

हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना आपात्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने काम करावं हे प्रात्यक्षिकांसह दाखवून प्रशिक्षण देण्यात आलं आहे. ज्यात डॉक्टर्स, नर्स, स्टाफ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा समावेश होता.
– डॉ. हेमंत देशमुख, केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -