तुम्ही आता या तारखेपर्यंत चॅनेल निवडू शकता; जाणून घ्या नवी डेडलाईन

ट्राय ने ग्राहकांना चॅनल निवडीसाठी ३१ मार्च पर्यंतची दिली शेवटची मुदतवाढ आपले मनपसंत चॅनल्स निवडण्यासाठी ट्रायने ग्राहकांना ३१ मार्च पर्यंतची आता शेवटची मुदत वाढ दिली आहे.

Mumbai
trai last date 31st
ग्राहकांना ३१ मार्च शेवटची डेडलाईन

टेलिकॉम रेग्युलॅरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने दिलेल्या नवीन निर्देशानुसार ग्राहकांना आपले मनपसंत चॅनल्सच्या निवडीसाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एका महिन्याचा वाढीव कालावधी यामुळे मिळाला आहे.

नवीन अॅपलीकेशन लॉंच

ग्राहकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर मिळावी, त्यांना योग्य आणि आपल्या आवडीचे, आपल्या भाषेतील, आपल्या बजेट नुसार, आपण निवडलेल्या चॅनल्चे मासिक भाडे, ग्राहकांच्या हिताच्या दुष्टीने त्याने काय निवडावे ज्यामुळे त्याचा पैशाची बचत होईल यासंबधी सूचना, माहीती या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे.

३१ मार्च नंतर काय

ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी दिलेल्या ३१ मार्च या शेवटच्या तारखे पूर्वी ग्राहकाने चॅनल्सची निवड केली नाही तर आशा ग्राहकांची थेट योग्य त्या प्लान प्रमाणे , भाषे प्रमाणे ते ग्राहकांना प्लान लागू केले जातील. ग्राहकांनी निवडलेल्या चॅनल्सचे भाडे हे त्याच्या मासिक बेसीक पॅक पेक्षा जास्त नसावे असेही ट्रायकडुन सांगण्यात आले आहे.