घरमुंबईबेस्टच्या आणिक आगारात ट्रान्सपोर्ट हब

बेस्टच्या आणिक आगारात ट्रान्सपोर्ट हब

Subscribe

१६ हेक्टर जागेचा होणार वापर

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे ट्रान्सपोर्ट हबची निर्मिकी करण्यात येणार आहे.यासाठी बेस्टच्या आणिक डेपोतील तब्बल १६ हेक्टर जागेचा वापर करण्यासाठी एमएमआरडीने मागणी केली होती. त्यानुसार, डेपोतील जागा एमएमआरडीएला देण्यास मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये तत्वता मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या योजनेचा अंतिम आराखडा बेस्ट समिती सदस्यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशी मागणी समिती सदस्यांनी केलेली आहे.

भविष्याच्या द़ृष्टीकोनातून मुंबईतील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता. शहरात एकत्रिकृत परिवहन हबची संकल्पना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत मुंबईकरांना एकाच ठिकाणी बेस्टची बस,मेट्रो अणि आंतरराज्य बस टर्मिनस(आयएसबीटी)ची सुविधा उपलब्ध

- Advertisement -

होणार आहे. यासाठी एमएमआरडीएतर्फे वडाळा विभागाचा गृहनिर्माण,व्यावसायिक आणि परिवहन हब म्हणून विकास करण्यात येणार आहे. बेस्टचा आणिक डेपो हा वडाळ्यामध्ये येतो.त्यामुळे एमएमआरडीएने शहर विकास विभागाला एकत्रिकृत परिवहन हब योजनेमध्ये आणिक डेपोचा समावेश करण्याची विनंती केली होती. त्यानुसार तसा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर बेस्ट प्रशासनाने मंजुरीसाठी सादर केला होता. या एकत्रिकृत परिवहन हब संकल्पनेमध्ये आंतरराज्य बस टर्मिनस,मेट्रो कास्टिंग यार्ड अणि बसचा डेपोदेखील असणार आहे.याचे बांधकाम टप्याटप्याने करण्यात येणार आहे.

डेपोची जागा दिल्याबद्दल बेस्ट उपक्रमास भरपाईपोटी महसुलातील वाटा देण्यात येणार आहे. डेपोची जागा देण्यास बेस्ट समितीने तत्वता मंजुरी दिली .परंतु या प्रकल्पाचा अंतिम आराखडा बेस्ट समितीसमोर सादर करण्याची मागणी समिती सदस्यांनी केली. त्यावर बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्र कुमार बागडे यांनी समिती समोर अंतिम आराखडा सादर केला जाईल असे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -