ठाण्यात झाडांचा संरक्षण कट्टा बनला कचरा पेटी

ठाण्यात झाडाच्या संरक्षणासाठी बांधलेला कट्ट्यामध्ये दुकानदारांकडून दुषित पाणी आणि कचरा टाकला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Thane
Trash is being dumped on the tree in Thane
ठाण्यात झाडांचा संरक्षण कट्टा बनला कचरा पेटी (छायाचित्र - अमित मार्कंडे)

झाडांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या हेतूने झाडाच्या बुंध्याशी संरक्षण कट्टा बांधण्यात येत आहे. मात्र या संरक्षण कट्टयामध्ये शेजारील दुकानदारांकडूनल केमिकल मिश्रीत दुषित पाणी आणि कचरा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी उजेडात आणला आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झाडांचे संरक्षण कट्टा जणू काय कचरा पेटीच बनल्याचे दिसून येत आहे.

पर्यावरण प्रेमींकडून वृक्षतोडीस तीव्र विरोध

शहरातील मेट्रो प्रकल्प असो वा रस्ता रूंदीकरण आदी विविध प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वृक्षांची तोड केली जात आहे. मात्र पर्यावरण प्रेमींकडून वृक्षतोडीस तीव्र विरोध होत आहे. पण पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या रेटयानंतर शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी तीन फूट बाय तीन फूटाचा संरक्षण कट्टा बांधण्यात येत आहे. मात्र नौपाडा परिसरातील झाडांच्या संरक्षण कट्टयात स्थानिक दुकानदार दररोज सकाळी दुकानातील स्वच्छता केल्यानंतर फिनेल आणि इतर केमिकल मिश्रीत दुषित पाणी झाडांच्या बुंध्याशी ओतत आहेत.

वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षणात हेळसांड

तसेच परिसरातील पादचारी सिगेटरचे थोटके टाकतात आणि पाण्याच्या पिचकाऱ्या मारल्या जातात त्यामुळे झाडांच्या खोडाला धोका होत आहे. मात्र याप्रकाराकडे पालिकाप्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची नाराजी मोने यांनी व्यक्त केली. याबाबत नगरसेवक अनभिज्ञ असून पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. एकीकडे वृक्षांची कत्तल केली जात असतानाच दुसरीकडे वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षणात हेळसांड होत असल्याचे दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सुर आहे.


हेही वाचा – ठाण्यातील पदपथावरच पालिकेचे अतिक्रमण; खोदकामामुळे वाहतूक कोंडी