घरमुंबईप्रवास रेल्वेचा, जेवण विमानासारखे

प्रवास रेल्वेचा, जेवण विमानासारखे

Subscribe

रेल्वेतील खराब जेवणामुळे त्रासलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विमानात जसे जेवण मिळते तसे जेवण आता रेल्वेतही मिळणार आहे. जूनपासून ही सुविधा सुरू होणार आहे. सर्व प्रथम ती प्रिमियम गाड्यांमधून दिली जाणार आहे. त्यांनतर इतर गाड्यांमध्ये मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांची दिली.
रेल्वे दररोज १२ लाख प्रवाशांसाठी जेवण तयार करते. प्रवाशांना विमानसेवेप्रमाणे जेवण मिळेल. ज्या गाड्यांना पेंट्री कार आहेत, त्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यात येईल. यासाठी पेंट्री कारमध्ये स्वयंपाक तसेच स्टोरेज व्यवस्थाही केली जाणार आहे. जेवण्याचे भाडे धुण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. नुकतेच शौचालयाजवळ ठेवलेले अन्न आणि पेय पदार्थ असल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे रेल्वेच्या कार्यपद्धतीवरही टीका झाली होती. त्यामुळे रेल्वेकडून जेवणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जात आहे.

हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा होणार वापर….

- Advertisement -

हाय डेफिनेशन कॅमेरा माध्यमातून रेल्वेच्या जेवण बनविणाऱ्या कोचवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेची खात्री करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा उपयोग केला जाणार आहे. याचबरोबर रेल्वेतील जेवण पॅक करण्यासाठी बायोडिग्रेडेबल पॅकेजिंगचा वापर केला जाईल.
आयआरसीटीसी आपल्या सर्व १६ बेस किचनमध्ये हाई डेफिनेशन कॅमेरा बसवणार आहे. हा कॅमेरा एका मोठ्या स्क्रीनवर जोडलेला आहे. ही प्रणाली इतकी तीक्ष्ण असणार आहे. त्यातून दूषित अन्नपदार्थ आणि झुरळांची तपासणी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर, कुकच्या हाताला घाण असेल, तरी कॅमेèयामधून टिपली जाईल. आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अन्नपदार्थांमधील भेसळीची किंवा अस्वच्छतेविषयी माहिती मिळवू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -