घरमुंबईओपन हार्ट सर्जरीविना 'टीएव्हीआर'वर उपचार

ओपन हार्ट सर्जरीविना ‘टीएव्हीआर’वर उपचार

Subscribe

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये टीएव्हीआर म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये टीएव्हीआर म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बायपास सर्जरीचा इतिहास असल्यामुळे ओपन हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी करणे शक्य नसलेल्या ७८ वर्षीय व्यक्तीवर ही आधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. नवी मुंबईतील नेरुळला राहणाऱ्या ७८ वर्षीय रुग्णाला गेले सहा महिने श्वसनाचा तीव्र स्वरूपाचा त्रास होत होता. त्यामुळे, त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. त्यांनी अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिऑलॉजिस्टचा सल्ला घेतला. तेथे, त्यांना तीव्र ऑर्टिक व्हॉल्व्ह स्टेनॉसिसचे निदान झाले. वयोमानामुळे आणि आरोग्याच्या समस्यांमुळे दुसरी सर्जरी करणे त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक होते. पण, टीएव्हीआरमुळे अशा रुग्णांसाठी नवी आशा निर्माण झाली आहे.

अशी केली जाते शस्त्रक्रिया?

पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीत हृदयावर शस्त्रक्रिया करणे सर्जनना शक्य होण्यासाठी स्टर्नमद्वारे कापून चेस्ट कॅव्हिटी खुली करावी लागत होती. टीएव्हीआर हे नॉन-सर्जिकल तंत्र असून त्यामध्ये स्कॅल्पेलऐवजी त्वचेच्या नीडल-पंक्चरद्वारे हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेस केले जातात.

- Advertisement -

टीएव्हीआरमध्ये ग्रॉइनमधून हृदयामध्ये कॅथेटर, बारिक लवचिक नळीद्वारे मिनिएचराइज्ड व्हॉल्व्ह बसवला जातो. अगोदरच्या ऑर्टिक व्हॉल्व्हच्या जागी ऑर्टाच्या बेसवर व्हॉल्व्ह बसवला जातो. त्यानंतर डॉक्टर फुगा उघडतात आणि त्यामुळे व्हॉल्व्हमध्ये हवा भरून तो जुन्या व्हॉल्व्हमध्ये बसवला जातो आणि स्टेनॉसिस वा नॅरोइंग यावर मात केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसाधारण अनेस्थेशियाखाली केली जाते. यासाठी अंदाजे एक तास लागतो. या तुलनेत, ओपन हार्ट सर्जरीसाठी ५ ते ६ तास लागतात.
– डॉ. संजीव कालकेकर, इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी कन्सल्टंट, अपोलो हॉस्पिटल्स

अपोलो हॉस्पिटल्सचे सीनिअर इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. सई सतीष यांनी सांगितले, “ ओपन हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी करण्यासाठी साजेशा नसणाऱ्या रुग्णांसाठी टीएव्हीआर हे वरदान आहे. व्हॉल्व्ह डिसिजचेच एक सर्रास आढळणारे स्वरूप म्हणजे त्याचा ऑर्टिक व्हॉल्व्हच्या लीफलेट्सवर (रक्ताच्या प्रवाहामुळे जो भाग उघडतो व बंद होतो) परिणाम करणारे कॅल्किफिकेशन. १० ते १५ वर्षे मेद साचल्याने लीफलेट्सवर परिणाम होतो. वयाच्या ७० ते ७५ वर्षांनंतर केवळ रुग्णांमध्ये लक्षणे दिसू लागतात. टीएव्हीआरमुळे रुग्णाचे आयुर्मान ९ वर्षांनी वाढते. आतापर्यंत ९५% टक्के शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -