घरमुंबईमुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळले; एकाचा मृत्यू

मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळले; एकाचा मृत्यू

Subscribe

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाडाची फांदी कोसळून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर महिला प्रवासी आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत.

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाडाची फांदी पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलुंड कॉलनी येथील गुरुगोविंद सिंह रस्त्यावर एका चालत्या रिक्षावर झाड पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत रिक्षातील दोन पुरुष प्रवासी जखमी झाले आहे तर रिक्षा चालक गंभीर झाले असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अग्रवाल रुग्णालयाचे डॉ. बार्वेले यांनी दिली आहे.

नेमके काय घडले?

मुलुंड कॉलनी परिसरात असलेल्या हिंदुस्थान चौकात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक रिक्षा आली. त्याच दरम्यान झाडाची फांदी चालत्या रिक्षावर पडून ही घटना घडली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर, एका महिला प्रवाशीची प्रकृती गंभीर असून त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, रिक्षा चालकही गंभीर अवस्थेत असून त्यांना प्लॅटिनम रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहीती अग्रवाल रुग्णालयाचे डॉ. बार्वेले यांनी दिली आहे. तर इतर दोन जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. पण, त्यांचे नातेवाईक त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन गेले आहेत.

- Advertisement -

याच झाडांच्या तीन वेळा फांद्या कोसळल्या

पावसाळ्यात झाड किंवा झाडाची फांदी कोसळून पादचाऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. विशेष म्हणजे याच झाडाच्या फांद्या यापूर्वी देखील तीन वेळा रस्त्यावर कोसळल्या होत्या. याबाबतची स्थानिक नागरिकांनी तक्रार देखील दिली होती. मात्र आज झालेल्या जिवीतहानीमुळे नागरिकांनी संताप केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -