घरमुंबईमुख्यमंत्र्यांविरोधातील खटला; ११ नोव्हेंबरला सुनावणी

मुख्यमंत्र्यांविरोधातील खटला; ११ नोव्हेंबरला सुनावणी

Subscribe

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ, नागपूर या मतदारसंघातून नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन फौजदारी गुन्हे/प्रकरणाची माहिती दिली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी अॅड. सतीश उके यांचे म्हणणे ऐकून घेत, या प्रकरणी ११ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ४ मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ रोजी दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फडणवीस यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयातून जामीन घेतला होता. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ, नागपूर या मतदारसंघातून नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन फौजदारी गुन्हे/प्रकरणाची माहिती दिली नाही. या विरोधात अॅड. उके यांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. पण संबंधित न्यायालय आणि उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर १ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील याचिकेची सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रथम श्रेणी न्यायदंडाधीकारी न्यायलयाने सुनावणी सुरु केली असून यावेळी अॅड. उके यांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणात पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -