घरमुंबईआदिवासींना वन कर्मचार्यांेची मारहाण?

आदिवासींना वन कर्मचार्यांेची मारहाण?

Subscribe

ग्रामस्थांकडून कार्यालयाची मोडतोड

जंगलातून होळी आणण्यासाठी गेलेल्या 5 आदिवासी तरुणांना वन विभागाच्या कर्मचार्यांनकडून बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून प्रत्युत्तर दिल्याची घटना घडली आहे.

वसईच्या पूर्व पट्टीतील कामण-बेलखडी येथील आदिवासी तरुण मंगळवारी रात्री 10 वाजता तुंगारेश्वर जंगलात होळीचे लाकूड आणण्यासाठी गेले होते. बुधवारी पहाटे 3 वाजता ते परतत असताना अचानक वन विभागाच्या कर्मचार्यांरनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात आदिवासींना बेदम मारहाण केली जात असताना त्यातील दोघेजण कसेबसे निसटून गावात पळून गेले. या हल्ल्याची घटना त्यांनी ग्रामस्थांना सांगितल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या तिघांना दवाखान्यात दाखल केले.

- Advertisement -

वन विभागाच्या कर्मचार्यां नी आदिवासींना मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल केल्याची बाब समजल्यावर शेकडो आदिवासींनी गोखिवरे रेंजनाका येथील वन विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यांनी कार्यालयात शिरून प्रचंड तोडफोड केली. कार्यालयातील खुर्च्या, कॉम्प्युटर, खिडकीची तावदाने त्यांनी फोडली. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर चौकशी करून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

दिवसा कामावर जावे लागत असल्यामुळे आम्ही नागेश तबाले, कमलेश चौधरी, अजय वजरा, मनोज थालकर, मेघनाथ कोंडस असे पाच जण रात्री जंगलात होळी आणण्यासाठी गेलो होतो. जंगलातूनच पारंपरिकरित्या आम्ही होळी आणतो. होळी घेऊन पहाटे निघालो असता अचानक वन विभागाच्या कर्मचार्यां नी आमच्यावर हल्ला केला, असे अजय वजरा याने सांगितले.याप्रकरणी चौकशी सुरू असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे वालीव पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -