घरमुंबईआणि नागपाड्याच्या चौकात तिरंगा डौलाने फडकला!

आणि नागपाड्याच्या चौकात तिरंगा डौलाने फडकला!

Subscribe

नागपाडा जंक्शनवर गुरुवारी भारताचा तिरंगा आणि भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या भित्तिचित्राच्या अनावरणाचा समारोह महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडला.

नागपाडा जंक्शन हे तसे वाहतूक कोंडीचे केंद्र बनले होते. परंतु आता या जंक्शनचे रुंदीकरणच नाही तर सुशोभिकरण करून स्वतंत्र भारताचा लढा ज्या ठिकाणी मौलाना आझाद यांनी पुकारला होता, त्याच चौकात आज २५ मीटर उंचीचा भारताचा तिरंगा डौलाने फडकला. या २५ मीटर उंचीच्या राष्ट्ध्वजाच्या स्तंभाचे तसेच भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या भित्तिचित्राचे अनावरण गुरुवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते पार पडले. स्थानिक सपाचे नगरसेवक रईस शेख यांच्या प्रयत्नातून आणि ई विभागाचे सहायक आयुक्त नितीन आर्ते यांच्या विशेष मेहनतीतून अखेर या चौकाचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

महापौरांच्या हस्ते झाले अनावरण

‘नागपाडा जंक्शन येथील २५ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ आणि भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे भित्तिचित्रा’चे अनावरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते बुधवारी सकाळी नागपाडा जंक्शन येथे पार पडले. प्रारंभी महापौर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ‘भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या भित्तिचित्रा’चे अनावरण करण्यात आले. त्यानंतर महापौरांच्या हस्ते नागपाडा जंक्शन येथील २५ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यानंतर पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना मान्यवरांनी आदरांजली वाहिली. ‘भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे भारताच्या शैक्षणिक प्रगतीत मोठे योगदान असून त्यांचे सुंदर असे भित्तिचित्र याठिकाणी उभारुन त्यांच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान केला’, असल्याचे महापौरांनी यावेळी बोलताना सांगितले.

- Advertisement -

‘भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे भारताच्या अखंडतेविषयी महत्वपूर्ण योगदान असून त्याची सरकारने दखल घ्यावी’, अशी सूचना यावेळी सपाचे आमदार अबू आझमी यांनी केली. आजचा हा दिवस ऐतिहासिक असून याप्रकारचा कार्यक्रम महापालिकेच्या सहकार्याने चांगल्या रीतीने पार पाडू शकलो, याबद्दल स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -