घरमुंबईबोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातून टनेल

बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातून टनेल

Subscribe

बोरीवली-ठाणे प्रवास अवघ्या २० मिनिटांत

बोरीवली-ठाणे असा घोडबंदरला वळसा घालून करावा लागणारा प्रवास येत्या वर्षांत अवघ्या २० मिनिटांचा होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बोरीवली-ठाणेदरम्यान टनेलच्या मार्गातून नवा रस्ता तयार करणार आहे. सध्या या प्रकल्पासाठीची वन विभागाची अंतिम मंजुरी प्रतिक्षेत आहे.

ठाणे -बोरीवली या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. या मार्गादरम्यान एकूण १०.२ किलोमीटरचा टनेल तयार करण्यात येणार आहे. हा टनेल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवलीदरम्यान तयार करण्यात येईल. ठाण्यातील टिकुजीनी वाडीपासून बोरीवली पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा हा एकूण २१ किलोमीटरचा रस्ता आहे. तर १ किलोमीटरचा जोड रस्ता असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८९०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण इतका मोठ्या खर्चाच्या प्रकल्पासाठी पैसे आणणार कुठून हा एमएसआरडीसीसमोरील प्रश्न आहे. त्यासाठी टोलसारखी यंत्रणा जरी उभारली तरीही राज्य सरकारचा मदतीचा हात अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राज्य सरकारची काय भूमिका असणार हे महत्वाचे ठरणार आहे. सध्याच्या ठाणे ते बोरीवली दरम्यानच्या प्रवासात सरासरी २ ते ३ तासांचा कालावधी लागतो. पण टनेलच्या लिंकमुळे हा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येईल. त्यामुळेच एमएसआऱडीसीसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

- Advertisement -

वन विभागाची परवानगी येत्या काही दिवसांत येणे अपेक्षित आहे.तसेच या प्रकल्पाचा डीपीआरही अंतिम स्थितीत आहे. त्यामुळेच उपनगरातील प्रवाशांना ईस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी हा एक उत्तम पर्याय असेल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी १०.२ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी दोन टनेल तयार करण्यात येतील. प्रत्येक टनेलमध्ये तीन पदरी रस्ता प्रस्तावित आहे. टनेलचा एकूण व्यास १५ मीटर इतका असणार आहे. पर्यावरण विभागाची परवानगी यासाठी आधीच मिळालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -