घरमुंबई४० हजार टॅक्सींमधील मीटर प्रिंटर बंद

४० हजार टॅक्सींमधील मीटर प्रिंटर बंद

Subscribe

परिवहन कार्यालयाचे आदेश सर्रास धाब्यावर

प्रवाशांनी केलेल्या प्रवासाचे भाडे त्यांना किती आणि योग्य आकारले आहे का, याचा खात्री प्रवाशांना होण्याकरता प्रत्येक काळ्या-पिवळ्या टॅक्सीतील मीटरसोबत प्रिंटर जोडण्याची सक्ती परिवहन कार्यालयाने केली आहे. त्यानुसार प्रवाशांना प्रवास केल्यानंतर छपाई बील उपलब्ध होते, मात्र मुंबईतील ४० हजार टॅक्सींमधील मीटर प्रिंटर बंद आहेत. तरीही आरटीओ प्रशासन निष्क्रिय आहे.

टॅक्सीने प्रवास करताना प्रवाशांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी प्रवाशांना प्रवासाचे योग्य बिल मिळावे यासाठी आरटीओने टॅक्सीमध्ये प्रिंटर बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे, मात्र मुंबईत धावणार्‍या हजारो टॅक्सींमध्ये एकही प्रिंटर बसवण्यात आलेला नाही किंवा मीटर आहे परंतु तो सुरूच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक टॅक्सी चालकांनी प्रिंटर काढून ठेवले असून, काही टॅक्सीतील प्रिंटर नादुरूस्त आहेत.

- Advertisement -

मुंबईत अशा सुमारे ४0 हजारांहून अधिक टॅक्सी आहेत. अशा प्रकारे आरटीओच्या मोटर वाहन कायद्याचे बिनदिक्कतपणे उल्लंघन केले जात आहे. आरटीओ विभागाने मीटरसह प्रिंटर अनिवार्य केल्याने आम्ही दोन हजार रूपये खर्च करून प्रिंटर घेतले, मात्र त्यासाठी कागदाचा रोलही भरतो. मात्र आरटीओ अधिकारी पासिंगच्या वेळीच मीटर आणि प्रिंटर तपासतात. त्यानंतर या प्रिंटरचा उपयोगच होत नाही, असे एका टॅक्सी चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दै. ‘आपलं महानगर’शी बोलतांना सांगितले.

अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये अधिकृत प्रवासी बिले मागितली जातात, अशा वेळी अनेकांची गोची होते. अशा वेळी टॅक्सीतील ही सुविधा उपयोगी पडणारी आहे. मात्र त्याबाबत जागृती नाही. प्रवासीही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होते.
– प्रवासी

- Advertisement -

प्रवाशांना अल्पदरात योग्य सुविधा मिळावी यासाठी आरटीओचा सदैव प्रयत्न आहे. मात्र प्रत्येक टॅक्सीवर लक्ष ठेवणे आरटीओ विभागाला शक्य नाही. तरीही टॅक्सीतील मीटर आणि प्रिंटर तपासणी अनेकवेळा होत असते. ज्या टॅक्सी चालकाकडे प्रिंटर नाही त्यावर आम्ही कारवाई करतो.
– अभय देशपांडे, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -