घरमुंबईघरफोडीचे दोन सराईत आरोपी गजाआड

घरफोडीचे दोन सराईत आरोपी गजाआड

Subscribe

साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बंद घरे बनावट चावी तसेच लोखंडी कटावणीने उचकटून सोने चांदीचा ऐवज व घरगुती गॅस सिलिंडर, टिव्ही अशा घरातील वस्तू चोरून नेणार्‍या दोन सराईत घरफोडीच्या आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. विशाल शेडगे (वय 35) आणि रामचंद्र मेंगे (वय 38) रा. दिवा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी 165 ग्रॅम सोन्याचे दागिने, 10 गॅस सिलिंडर, 7 टिव्ही असा एकूण साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिवा परिसरात अनेक दिवसांपासून घरफोडीचे प्रकार खूपच वाढले होते. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे घरफोडीचे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केली होती. शुक्रवारी रात्री गुन्हा प्रकटीकरणाचे पोलीस दिवा परिसरात रात्रीच्या सुमारास गस्त घालीत असतानाच, एक इसम संशयास्पदपणे फिरताना पोलिसांना आढळला पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळू लागला. अखेर पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विशाल शेडगे असे नाव असून दिवा येथे राहत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

- Advertisement -

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चाव्यांचा जुडगा आणि लोखंडी कटावणी आढळून आली. पोलिसी हिसका मिळताच त्याने 10 घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरलेले सोन्याचे दागिने हे विशाल व अलोक असे तिघेजण वाटणी करून घेत असत. तसेच सोन्याचे दागिने ओळखीच्या ज्वेलर्सकडे ठेवल्याचे त्यांनी सांगितले. दोघांना पेालिसांनी अटक केली असून अलोकचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -