घरमुंबईस्टार प्रजातीचे २९३ कासव जप्त; दोन आरोपींना अटक

स्टार प्रजातीचे २९३ कासव जप्त; दोन आरोपींना अटक

Subscribe

नवी मुंबईच्या वाशी नाका येथून दोन कासवांची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २९३ स्टार प्रजातीचे कासव जप्त करण्यात आले आहेत.

स्टार प्रजातीच्या कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून २९३ जिवंत कासवांना हस्तगत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीवरुन नवी मुंबईचे महसूल गुप्त वार्ता निर्देशनालय, वन्यजीव गुन्हा नियंत्रण ब्युरो, बेलापूर आणि वनपरिक्षेत्र अदिकारी वन्यजीव, ठाणे यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. वाशी फ्लायओव्हरच्या खाली वाशी नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे. स्टार प्रजातीच्या कासवांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

अशी घडली घटना

पोलिसांनी कोंडिया लिंगाराजू आणि श्रीकांत लिंगाराजू या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही कर्नाटकातील आहेत. त्यांच्याकडून स्टार प्रजातीच्या जिवंत कासवांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. एका शिवनेरी बसमधून दोन जण उतरले. त्यांच्या हालचालीवरुन पोलिसांना संशय आला असताना त्यांनी त्यांच्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी चार वेगवेगळ्या बॅगमध्ये लहान मोठ्या आकाराचे स्टार प्रजातीचे कासव आढळले. पोलिसांनी त्यांना कासवांसह ताब्यात घेतले.

- Advertisement -

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दोन्ही आरोपींना कासवांसह बेलापूरच्या वन्यजीन अपराध नियंत्रण ब्युरो इथे नेण्यात आले. दरम्यान आरोपींची चौकशी केली असता हे कासव तानाजी नावाच्या व्यक्तीला देण्यास आले असल्याचे सांगण्यात आले आहे. कासवांना ताब्यात घेतले असून या सर्व प्रकणाचा तपास सुरु आहे. दोघांची देखील चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -