घरमुंबई९ वर्षाच्या मुलीची हत्या; दोघांना अटक

९ वर्षाच्या मुलीची हत्या; दोघांना अटक

Subscribe

याप्रकरणी फिर्यादीच्या मावस दिरासह मृतदेह नेण्यासाठी टेम्पो चालविणाऱ्या अशा दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

निधन झालेल्या मावस भावाच्या ९ वर्षीय मुलीला उत्तम शिक्षण मिळावे म्हणून तिला घरी आणून तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. एवढेच नाही तर या घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह कसारा घाटात फेकून देण्यात आला. याप्रकरणी फिर्यादीच्या मावस दिरासह मृतदेह नेण्यासाठी टेम्पो चालविणाऱ्या अशा दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मुलीला वाईट मार्गी लावण्याची इच्छा

पोलिसांनी केलेल्या तपासात, आरोपीने मृत मावस भावाच्या डबघाईला आलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मुलीला उत्तम शिक्षण देण्यात येईल अशी बतावणी करत ९ वर्षीय मुलीला आणण्यात आले. मुलगी मोठी झाल्यानंतर तिला वाईट मार्गाला नेण्याचा आरोपीचा उद्देश होता, असे प्राथमिक तपासात आढळल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

- Advertisement -

विविध पथकांच्या आधारे मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न

फिर्यादी हिना नवनाथ चव्हाण (२८) रा. मु.पो. चाफेनेर ता. कन्नड, जि. औरंगाबाद यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार त्यांची ९ वर्षीय मुलगी भारती हिला सहा महिन्यापूर्वी शिक्षणासाठी फिर्यादीचा मावस दीर प्रकाश उर्फ हज्जू हरी राठोड (३८) रा. धावगी रोड, रिद्धिसिद्धि बिल्डिंग उत्तन जि. ठाणे यांच्याकडे पाठविली होती. ती बेपत्ता झल्याची तक्रार नोंदविताच उत्तन सागरी पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरु केला. पोलिसांची विविध पथकं तयार करून अपहृत मुलीचा शोध सुरु करण्यात आला. यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आसपासचा परिसर, दुकानदार, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी शोध घेतला. सर्व प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलीस पथक फिर्यादीच्या मावस दिराच्या घरी चौकशीसाठी पोहचले. त्यावेळी मावस दीर प्रकाश उर्फ हज्जू राठोड परिवार हा घटनास्थळी सापडला नाही. पोलिसांनी राठोड कुटुंबाचा शोध सुरू केला. प्रकाश राठोड याची पत्नी अनिता राठोड रा. मौजे लोणजे ता. चाळीसगाव जि. जळगाव आणि प्रकाश राठोड यांचा नातेवाईक आकाश चव्हाण रा. मौजे केडगाव, ता. दौंड, जि. पुणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

…म्हणून मुलीची हत्या केली

चौकशी केली असता भारती हिला प्रकाश याने शिक्षणासाठी घरी आणले. मात्र तिला शाळेत टाकलेच नाही. या उलट चिमुरडीला घरकामासाठी वापर करीत होते. यावेळी घरकाम न केल्यास चिमुरडीला मारहाण सुद्धा करण्यात येत. उपाशी ठेवत होते. भारतीकडून प्रकाश आणि अनिता काम करून घेत असल्याने घरकामवालीचे पैसे वाचत होते. दरम्यान ७ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीने लघुशंका केली. याचा राग अनावर झालेला प्रकाश याने भारतीला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबला. भारती हालचाल करीत नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात घेऊन आरोपी प्रकाश आणि अनिता यांनी चिमुरडीचा मृतदेह नायलॉनच्या गोणीत बांधून पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये ठेवला. त्यानंतर चार दिवासाने १० नोव्हेंबर रोजी प्रकाशचा नातेवाईक अशोक चव्हाण (२२) याला बोलावून घेण्यात आले. त्याला घडलेल्या प्रकारची माहिती देत ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घरातील सामान काश्मीर येथे नेण्याचे सांगून छोटा हत्ती टेम्पोने मृतदेह कसारा घाटात दरीत नेऊन फेकल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

- Advertisement -

मुख्य आरोपीचा पोलीस घेताहेत शोध

मिळालेल्या माहिती नंतर पोलीस पथकाने कसारा घाटात धाव घेतली. तेथे जाऊन फेकलेला ड्रम शोधून त्यातील मृत भारतीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी अनिता राठोड (३०) हिला ९ नोव्हेंबर रोजी आणि आरोपी आकाश चव्हाण याला १० नोव्हेंबर रोजी अटक करून त्यांना न्यायालयात नेले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ठाणे ग्रामीण पोलीस आता मुख्य आरोपी प्रकाश राठोड याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -