घरमुंबईटेम्पोतील Amazon चे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक

टेम्पोतील Amazon चे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक

Subscribe

भिवंडी तालुक्यातील ठाकुरपाडा या ठिकाणी Amazon मधील विविध प्रकारचे ३८२ बॉक्स साहित्य घेऊन जाणारा टेम्पो एका बाजूला उभा करून ठेवला असता त्यामधील १ लाख ७७ हजार ८६२ रुपयांचे साहित्य असलेले १३ बॉक्स टेम्पोचे सील तोडून चोरणाऱ्या दोघा आरोपींना कोनगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी १ लाख ४ हजार ९०४ रुपयांचे साहित्य व गुन्हयात वापरलेली ४ लाख रुपयांची एक मारूती सुझूकी कंपनीची अर्टीगा कार असा एकूण ५ लाख ४ हजार ९०४ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे .

Amazon बॉम्बेच्या ग्लोबल कॉम्प्लेक्स गंगाराम पाडा, कुकसेगांव येथील गोदमातून विविध कंपनीचे साहित्य असलेले ३८२ बॉक्स ज्यामध्ये बॉडी लोशन, टॉय मिक्सर खेळणे, डिझायनर लेडीज साड्या, जॉकी मेन्स् कॉटन टिशर्ट, हेडसेटस्, डिशवॉशर, वायरलेस गेमिंग हॅन्डसेट असा माल भरलेला टेम्पो चालक राहुलकुमार लखन माहतो याने खाली करण्यासाठी Amazon बॉम्बे गोडावून प्रथमेश कॉम्प्लेक्स, एफ. एस. सी. गोडावूनचे मागे, ठाकुरपाडा याठिकाणी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी उभा करून ठेवला असता रात्री एक वाजताच्या सुमारास आलेल्या अज्ञात चोरट्यांनी टेम्पो च्या मागील बाजूस असलेले सील तोडून त्यामधील १३ बॉक्सची चोरी केली. चालकाने दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

सदर गुन्हयात पोलीस उपायुक्त राजकुमार शिदे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितिन कौसडीकर, कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नरेंद्र पवार, स. पो. नि. संतोष बोराटे, पो. ना. मासरे, पो. शि. चोरगे, व पो. शि. पाटील, पो. शि. ढवळे यांनी गुन्ह्याचा कसोशीने तपास करून अजय गणेश पाटील वय २१ वर्षे, रा. सोनाळे गाव, ता. भिवंडी, स्वप्निल मधुकर पाटील वय २१ वर्षे, रा. पुंडास, पो महापोली, ता. भिवंडी यांचा शोध घेवून सदर गुन्ह्यात त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -