साडेसात लाख रुपयांच्या गांजासह दोघांना अटक

Mumbai
Ganja

सुमारे साडेसात लाख रुपयांच्या गांजासह दोघांना रविवारी आझाद मैदान युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अबदार अली आणि अंतारुल मोहफेजद्दीन अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मानखुर्द आणि नेरुळचे रहिवाशी आहे. या दोघांकडून पोलिसांनी 37 किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. रे रोड रेल्वे स्थानकाजवळील बॅरेस्टर नाथ पै मार्गावर काहीजण गांजाची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी सायंकाळी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

यावेळी तिथे आलेल्या अबदार आणि अंतारुल या दोघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना 37 किलो गांजाचा साठा सापडला. या गांजाची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये आहे. हा साठा त्यांनी इतर शहरात आणला होता. त्याच्या विक्रीसाठी ते दोघेही रे रोड रेल्वे स्थानकाजवळ आले होते. गांजा बाळगणे आणि त्याची विक्री केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही सोमवारी सायंकाळी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here