घरमुंबईमहालक्ष्मी पुलाच्या जागी आता दोन पूल उभारणार!

महालक्ष्मी पुलाच्या जागी आता दोन पूल उभारणार!

Subscribe

महालक्ष्मी येथील रेल्वे पुलाचे आयुर्मान १०० वर्षे होत आल्याने आता हा धोकादायक पूल पाडण्याची घटिका समीप आली आहे. महालक्ष्मी रेल्वे पूल धोकादायक झाल्याने या पुलाच्या जागी वरळीतील केशवराव खाड्ये मार्गावरुन हाजीअलीच्या दिशेला आणि डॉ. ई. मोझेस रोडवर सेनापती बापट मार्ग जंक्शनपर्यंत दोन पुलांची उभारणी केली जाणार आहे. या पुलाच्या बांधकामाचा अखेर मुहूर्त सापडला असून यासाठी विविध करांसह ७४५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

पुलाचं जीवनमान पूर्ण झालं

महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील डॉ. ई. मोझेस रोड आणि केशवराव खाडे मार्ग या रेल्वे मार्गावर पूल असून सात रस्ते असलेल्या संत गाडगे महाराज चौकात हा पूल उतरतो. महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पूल हा ताडदेव, हाजी अली, महालक्ष्मी मंदिर परिसर आणि वरळी व लोअर परळ विभागाला जोडला जातो. सध्या अस्तित्वात असलेल्या महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पुलावर होणारी वाहतूक कोंडी तसेच या हा पूल ९० ते १०० वर्षे जुना झाल्याने त्याचे जीवनमान पूर्ण झाले आहे. या पुलावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून तसेच सुधारीत विकास नियोजन आराखडा २०३४ मधील तरतुदीनुसार आणि मेसर्सली असोसिएट्स यांनी सादर केलेल्या सर्वसमावेशक चलनशीलता आराखडा अंतर्गत दोन नवीन पुलांची गरज असल्याचे नमूद केले आहे.

- Advertisement -

कोस्टल रोडसाठी पुल आवश्यक

कोस्टल रोड झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन सुरळीत करण्याकरता डॉ. ई. मोझेस मार्ग आणि केशवराव खाड्ये मार्गावर रेल्वे लाईनवर पूल बांधणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेने या पुलांची शक्यता पडताळून पाहण्यासाठी स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून तसेच आयआयटी मुंबई यांची फेरतपासणीसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानुसार, मागवलेल्या निविदांमध्ये ऍप्को-सीआरएफजी या संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला विविध करांसह एकूण ७४५ कोटी रुपयांना कंत्राट काम देण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा पूल दक्षिण बाजूला केबल स्टेडचा वापर करून बांधण्यात येणार असल्याचीही माहिती रस्ते अभियंता विभागाने दिली आहे. हा पूल पूर्णपणे न पाडता या दोन नवीन पुलांची बांधकामे हाती घेण्यात येणार असून दोन्ही पुलांची बांधकामे पूर्ण झाल्यानंतर जुन्या पुलाचे पाडकाम हाती घेतले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

दोन्ही पुलांचा तपशील

- Advertisement -

पुलाची लांबी : उत्तर बाजूस ६३९ मीटर
पुलाची लांबी : दक्षिण बाजूस ८०३ मीटर

पुलाची रुंदी : उत्तर बाजूस १७.२ मीटर आणि २३.२ मीटर
पुलाची रुंदी : दक्षिण बाजूस १७.२ मीटर आणि २३.१ मीटर

स्पॅनची संख्या : उत्तर बाजूस : १२ नग
स्पॅनची संख्या : दक्षिण बाजूस : १३ नग

पाया बांधकाम : पाईल फाउंडेशन, ओपन फाऊंडेशन

बांधकामाचा प्रकार : आर.सी.सी, पीएससी, स्ट्रक्चरल स्टील

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -