घरCORONA UPDATECorona : ठाण्यातील खोपट बस डेपोमधील दोघांचा मृत्यू; तर ४३ जणांना लागण

Corona : ठाण्यातील खोपट बस डेपोमधील दोघांचा मृत्यू; तर ४३ जणांना लागण

Subscribe

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने आण करणाऱ्या एसटी कर्मचारींना तब्बल ४३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्दाकायक माहिती समोर आली आहे. यामध्ये वाहन परिक्षकासह वाहकाचा शुक्रवारी मृत्यू झाला असून एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता खोपट बस डेपो क्रमांक १ मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. आतापर्यंत ४३ जणांना लागण झाली आहे. असे असताना संपूर्ण डेपो बंद न करता केवळ विश्रांती कक्ष सील करून कारवाईचा दिखावा करण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने इंटकचे जिल्हाअध्यक्ष सचिन शिंदे यांनी थेट जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा डेपो बंद करावा, अशी मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्हा रुग्णालयासह,छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या पाठोपाठ आता अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या एसटी विभागातील वाहन चालक, वाहक यांच्यासह वाहन परीक्षक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च पासून टाळेबंदी करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयातून ने-आण करण्याबरोबरच परराज्यातून कामानिमित्त आलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर घेवून जाण्यासाठी एसटी महामंडळाने महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र आता याच अत्यावश्यक सेवे पुरविणाऱ्या एसटी विभागालाच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या खोपट एसटी बस डेपो क्रमांक १ येथून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, दादर, मंत्रलय सीएसटी या भागात सेवा देण्याचे काम करीत आहे. मात्र याच डेपोमध्ये सध्याच्या घडीला ४३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तर शुक्रवारी एकाच दिवशी या आजाराने वाहक आणि वाहन परीक्षक दगावले आहेत. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानुसार इंटकचे जिल्हाअध्यक्ष सचिन शिंदे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या निवेदनाद्वारे त्यांनी डेपो बंद करावा ठाण्यातील विविध डेपोमधील अत्यंत आवश्यक कर्मचारीना उपस्थिती बाबत सक्ती करावी, अशी मागणी केली आहे. सर्व डेपो सॅनिटायझरने पूर्णता स्वच्छ करावे, असेही सांगितले आहे. तर एसटीच्या बसेसही या रोजच्या रोज सॅनिटायझरने स्वच्छ कराव्या, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

दरम्यान, शहापूर येथील डेपोमध्ये १४ कर्मचारी पॉझिटीव्ह सापडल्यामुळे तेथील वैदयकीय अधिकारी यांनी पूर्ण डेपो बंद करण्यास सांगितले. मात्र खोपट डेपो क्रमांक १ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे माहीत असून देखील संपूर्ण डेपो बंद न करता केवळ विश्रांती कक्ष सील करण्यात का आला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एकूणच एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याने डेपो बंद करुन पूर्णपणे सॅनिटाईज करावा. एसटी कर्मचारीना प्रतिबंधक उत्कृष्ट दर्जाचे साहित्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -