घरमुंबईउल्हासनगरात सी एच एम महाविद्यालयासमोर तरुणींची हाणामारी

उल्हासनगरात सी एच एम महाविद्यालयासमोर तरुणींची हाणामारी

Subscribe

सध्या सोशल मीडियावर दोन तरुणींचा हाणामारी करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही हाणामारी रोखण्यासाठी त्या दोघींच्या मैत्रिणी प्रयत्न करत होत्या. मात्र तरीही त्या दोघी एकमेकांवर तुटून पडल्या होत्या.

उल्हासनगरच्या सी एच एम महाविद्यालयासमोर दोन तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे . या तरुणी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत की अन्य कुठल्या आहेत तसेच घटना कधी घडली? याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये सी एच एम महाविद्यालयासमोर या तरुणी अज्ञात कारणामुळे आरडाओरड आणि भांडण करीत असून त्यांच्या मैत्रिणी भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजूबाजूला बघ्यांची गर्दी देखील दिसत आहे. मात्र तरीही त्या दोघी एकमेकांवर तुटून पडल्या आणि एकमेकांचे केस ओढताना रस्त्यावर पडल्या असे दिसत आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयालयीन विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून महाविद्यालय प्रशासन देखील या घटनेची माहिती घेत आहेत .

- Advertisement -

Viral Video : उल्हासनगर CHM कॉलेज येथे दोन तरुणींची फ्रि स्टाईल हाणामारी

Viral Video : उल्हासनगर CHM कॉलेजच्या बाहेर दोन तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 23, 2019

सी एच एम महाविद्यालय परिसराच्या बाहुला असलेल्या रेल्वे स्थानक परिसर आणि संजय गांधी नगर या परिसरात सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री होत असून येथील स्कायवॉकवर अनेकवेळा लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त असणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक वारंवार करीत आहेत .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -