घरमुंबईभाजलेल्या बाळाच्या हातावर शस्त्रक्रिया

भाजलेल्या बाळाच्या हातावर शस्त्रक्रिया

Subscribe

केईएम हाॅस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी भाजलेल्या प्रिन्स या अडीच महिन्याच्या बाळाच्या हातावर अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

केईएम हाॅस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी भाजलेल्या प्रिन्स या अडीच महिन्याच्या बाळाच्या हातावर अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या बाळाचा हात कापला आहे. केईएम हॉस्पिटलच्या बालरोग विभागात गुरुवारी अचानक शॉर्टसर्किट झालं होतं. या घटनेत केईएममध्ये हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला होता. बुधवारी मध्यरात्री २.५० वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली. आगीच्या लोटात अडकल्याने बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे. त्याच भाजलेल्या हातावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या भाजलेल्या हाताला संसर्ग झाल्याने डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याचा हात कापण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमके काय झाले?

उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर यांना अडीच महिन्यांपूर्वीच एक पुत्रप्राप्ती झाली होती. पण, प्रिन्सची तब्येत सतत खालावलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर, कुटुंबियांना प्रिन्सच्या छातीत छिद्र असल्याचे कळले. त्यामुळे, कुटुंबिय बाळाला आपल्या भावोजींच्या घरी दाखल झाले. त्यानंतर, उपचारांसाठी ते पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तपासणी करत मंगळवारी बाळाला अॅडमिट करुन घेतलं. बुधवारी मध्यरात्री २.५० वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली. सोमवारी त्या भाजलेल्या हातावर शस्त्रक्रिया करुन त्याचा हात काढून टाकण्यात आला असल्याची माहिती केईएम हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘स्मार्टमीटर’ योजना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -