घरCORONA UPDATEग्रँटरोडमध्ये आता सुरक्षा रक्षकासह टॅक्सीचालकालाही करोना!

ग्रँटरोडमध्ये आता सुरक्षा रक्षकासह टॅक्सीचालकालाही करोना!

Subscribe

मुंबईतील ग्रँट रोड, मलबार हिल येथील महापालिकेच्या डी विभागात आतापर्यंत करोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत या विभागात २१ इमारती आणि चाळींचे परिसर प्रतिबंधित म्हणून बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयातील सुरक्षा रक्षकासह ग्रँटरोड येथील टॅक्सीचालकाचीही भर पडली आहे. महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीतील ग्रँटरोड,मलबार हिल आदी परिसरांमध्ये मागील काही दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण वाढतच जात आहे. आतापर्यंत या विभागात आढळून आलेले रुग्ण हे इमारतीत राहणारे तसेच परदेशातून जाऊन आलेले होते. परंतु आता या विभागातील चाळींमध्ये राहणारे रुग्ण आढळून आले आहेत.

वोकहार्टच्या सुरक्षारक्षकालाही कोरोना

ग्रँटरोड येथील दुधवाला चाळीमध्ये राहणाऱ्या एका टॅक्सीचालकाला करोनाची लागण झाली आहे. तळ अधिक एक मजली असलेल्या या इमारतीच्या तळ मजल्याचा कमर्शियल वापर तर वरच्या मजल्याचा निवासी वापर होत आहे. या सर्वांचं सामायिक(कॉमन) शौचालय असल्यामुळे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दुधवाला चाळीचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करत येथील ६४ रहिवाशांना थेट हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले. तर आर. एस. निमकर मार्गावरील चाळीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून ती व्यक्ती कामाला आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरीत अन्यत्र हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना संदर्भात लोकांमध्ये आता अधिक जागरुता झालेली आहे. त्यामुळे कस्तुरबातून अहवाल येण्यापूर्वीच कोरोनाग्रस्त रुग्ण घाबरुन महापालिकेला याची माहिती देतो. त्यामुळे रुग्णाचा चाचणी अहवाल तपासून त्वरीत त्या इमारतीला अथवा चाळीला सील केले जाते. तो परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. कस्तुरबातून पडताळणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अहवाल येतात. त्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण स्वत:हूनच पुढे येत असल्यामुळे एक दिवस आधीच कार्यवाही करता येते. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये याचा अधिक संसर्ग होण्यापासून टाळता येतो, असे डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले.

एकूण रुग्णांची संख्या : ४०

- Advertisement -

बाधित क्षेत्रांची संख्या : २१

सील केलेल्या इमारती आणि सोसायट्यांची संख्या : २१

चाळ आणि झोपडपट्टीतील रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्ती : २३

चाळ आणि झोपडपट्टीतील रुग्णांच्या कमी संपर्कातील व्यक्ती : ७६

क्वारंटाईनमधील क्षमता : ५५६


हेही वाचा – मुंबईतलं मोठं रुग्णालय सील; ३ डॉक्टर, २६ नर्सेसना कोरोनाची लागण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -