घरCORONA UPDATECoronavirus: वोक्हार्टच्या २ आणि जसलोक हॉस्पिटलची १ नर्स कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus: वोक्हार्टच्या २ आणि जसलोक हॉस्पिटलची १ नर्स कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील दोन नर्सेस कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तसेच जसलोक हॉस्पिटलमधील एक नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ही नर्सचा कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नाही. तर मुंबईतीलच वरळी कोळीवाडा येथे ८ लोकांना कोरोना असल्याचे कळल्यानंतर आणखी ३६ लोकांना कोरोना असल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांची चाचणी करण्यात आली आहे.

वोक्हार्ट हॉस्टिपलमधील एक पुरुष आणि एक महिला नर्स पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोघेही ७० वर्षीय कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. हा रुग्ण अँजिओप्लास्टीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. सुरुवातील त्याच्यात कोणतेही कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती मात्र नंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. वोक्हार्टचे उपाध्यक्ष डॉ. पराग रिंदानी म्हणाले की, “सध्या दोघे नर्स बरे असून लवकरच त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल.”

- Advertisement -

वरळी कोळीवाड्यात ३६ जण धोक्यात

वरळी कोळीवाडा परिसरात आठ कोरोना बाधित आढळल्यानंतर आणखी ३६ लोक धोक्यात असल्याचे समजले आहे. हे लोक राहत असलेल्या परिसराचे आता चार भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. संशयित लोकांचा केंद्रबिंदू, संपर्कात आलेल्या अति धोक्याच्या व्यक्ती, कंटेनमेन्ट झोन आणि बफर झोन अशाप्रकारे वर्गीकरण करुन लोकांची तपासणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -