घरमुंबईविदेशी चलन लुटणार्‍या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

विदेशी चलन लुटणार्‍या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

Subscribe

दोन्ही आरोपींकडून साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

विदेशी चलन लुटणार्‍या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. जेठाराम उद्धाराम माली ऊर्फ जयेश आणि राजकुमार राजाबली दुबे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी अमेरिकन, सिंगापूर डॉलर, गुन्ह्यांतील कार, मोबाईल, सीमकार्ड असा साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रदीप माधव मेंसुरे हे वयोवृद्ध फॉरेन करंसी एक्सचेंजचे मालक असून त्यांचे गोरेगाव परिसरात एक कार्यालय आहे. 1 फेब्रुवारीला त्यांना हार्दिक नावाच्या एका व्यक्तीने चार हजार अमेरिकन आणि दोन हजार सिंगापूर डॉलर डिलीव्हरी करण्यास सांगितले होते. त्यानंतर ते गोरेगाव येथे गेले होते, यावेळी इनोव्हा कारमधून आलेल्या चार तरुणांनी त्यांना सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील सुमारे चार लाख रुपयांचे विदेशी चलन घेऊन पलायन केले होते. या प्रकारानंतर त्यांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या पथकातील गणेश पवार, नितीन पेटकर, चंद्रकांत पाटील, अनिल वारे, राजेश घडशी, शकील शेख, अमोल जाधवख, संतोष चव्हाण, गोरख देशमुख यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.

- Advertisement -

या गुन्ह्यांतील काही आरोपी विलेपार्ले परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच या पथकाने तेथून जेठाराम आणि राजकुमार या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांसह त्यांनी विलेपार्ले, आंबोली, जुहू परिसरातील विदेशी चलनाचा व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांना लुटल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यांत त्यांचे काही सहकारी फरार असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -