घरमुंबईमहामार्गावरील अपघात प्रकरणी मयत मोटारसायकलस्वारांवर गुन्हा दाखल!

महामार्गावरील अपघात प्रकरणी मयत मोटारसायकलस्वारांवर गुन्हा दाखल!

Subscribe

मोटारसायकल भरघाव वेगाने चालवल्यामुळे दोन तरुण स्वतःच्या मरणास कारणीभूत झाले.

कल्याण-कर्जत महामार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार ठार झाले होते. भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलने मागून एका ट्रकला धडक दिल्याने हे मोटारसायकलस्वार ठार झाले होते. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकलवरील ताबा सुटल्यामुळे…

गुरुवारी रात्री १:३० वाजताच्या सुमारास कल्याण-कर्जत महामार्गावरून सुरज रघुनाथ सोनवणे (वय २८) राहणार मोतीराम प्राईड, अंबरनाथ (पूर्व) आणि चेतन विजय वाघे (वय ३६) राहणार सानेवाडी, बदलापूर (प) हे दोघे मित्र मोटारसायकलने भरघाव वेगाने उल्हासनगरच्या दिशेने जात होते. ते रिलायन्स पेट्रोल पंपच्या पुढे पोहचल्यानंतर त्यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि मोटारसायकलच्या पुढे जाणाऱ्या एम एच ०९ सी यु ९७७४ या क्रमांकाच्या ट्रकवर आदळली.

- Advertisement -

स्वतःच्या मरणास कारणीभूत असल्याचे निष्पन्न

या भीषण अपघातात सुरज सोनवणे आणि चेतन वाघे या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. चव्हाण यांनी या प्रकरणी तपास सुरू करून मोटारसायकल आणि ट्रक ताब्यात घेतला, ट्रकचालकला देखील ताब्यात घेतले. मात्र तपासात मोटारसायकल भरघाव वेगाने चालविल्यामुळेच सुरज रघुनाथ सोनवणे आणि चेतन वाघे हे स्वतःच्या मरणास कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – लग्नाचे आमिष दाखवून ५२ घटस्फोटीत महिलांना लाखोंचा गंडा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -