घरमुंबईउबेर टॅक्सीचालकाकडून तरुणीची फसवणूक

उबेर टॅक्सीचालकाकडून तरुणीची फसवणूक

Subscribe

उल्हासनगर येथे एका तरुणीचा ४० हजाराचा आयफोन लंपास करुन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उबेर चालक राजेशचा पोलीस शोध घेत आहेत.

महिला सुरक्षित नसल्याचे दिवसेंदिवस समोर येत आहे. देशात आज कोणत्याच वयोगटातील महिला सुरक्षित नाहीत अगदी तीन वर्षांच्या चिमुकलीपासून ते सत्तर वर्षाची वयोवृद्ध महिला देखील सुरक्षित नाही. सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून अनेकादा ओला, उबेर अशा खासगी वाहनातून प्रवास करतात. मात्र बऱ्याचदा उबेरच्या चालकांकडूनच धोका असल्याच्या घटना समोर आल्या असून अशीच एक घटना उल्हासनगर येथे घडल्याचे समोर आले आहे. उबेरमध्ये एका महिलेचा उबेरच्या चालकांनेच मोबाईल चोरल्याची घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर ३ येथील दसरा मैदान परिसरात मनीष अपार्टमेंट या इमारतीमध्ये गुंजन किशनचंद भाटिया (२६) ही तरुणी तिच्या कुटुंबासह राहते. २२ एप्रिल रोजी १० वाजण्याच्या सुमारास गुंजन मुंबई विमानतळावर उतरते आणि विमानतळापासून घरी येण्यासाठी ती उबेर टॅक्सीमध्ये बसते. दरम्यान, गुंजनच्या आयफोनची बॅटरी लो होते. मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी ती टॅक्सीचालक राजेश याला विश्वासाने ड्रायव्हर सीटजवळ मोबाईल चार्जिंगसाठी देते. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ती उल्हासनगर येथील घराजवळ पोहचते. ती राजेशकडे आपला मोबाईल फोन मागते. मात्र, गुंजनचा मोबाईल लंपास करण्याच्या उद्देशाने राजेश तिला आपल्याकडे फोन दिला नसल्याचे सांगतो. त्यानंतर या दोघांमध्ये वाद देखील होतो. मात्र उबेर चालक आपल्याकडे मोबाईल दिलाच नसल्याचे सांगतो आणि निघून जाते. दरम्यान, आपला ४० हजारांचा आयफोन लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर गुंजने पोलिसात धाव घेऊन उबेर चालक राजेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

वाचा – ओला- उबेरला कायद्याच्या कक्षेत आणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -