घरमुंबई'जरा धीर धरा' उद्धव ठाकरेंचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सल्ला

‘जरा धीर धरा’ उद्धव ठाकरेंचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सल्ला

Subscribe

बेस्टने काळानुसार बदल करीत वाटचाल सुरू केली आहे. बेस्टच्या कर्मचार्‍यांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य होतील, त्यासाठी कर्मचार्‍यांनी धीर धरावा, असे आवाहन सोमवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्टच्या ईलेक्ट्रिक बस उद्घाटन कार्यक्रमात कर्मचार्‍यांना केले आहे.

बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या 10 इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.तसेच प्रवाशांसाठी ट्रॅकिंंग अ‍ॅप या मोबाईल अ‍ॅपचेदेखील लोकार्पण यावेळी करण्यात आले. शिवसेना-भाजपा युती गेली 25 वर्षे घट्ट राहिल्यामुळे आज राज्यात अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आल्याचे पहावयास मिळते आहे.

- Advertisement -

बेस्टने काळानुसार बदल करीत वाटचाल करणे ही आजची गरज असल्याचे सांगत बेस्ट आणि पालिका मुंबईतील जनतेला सेवा देण्यास बांधिल असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच बेस्टच्या कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा न येता त्यांना पगार वाढ देखील मिळेल असे आश्वासन बेस्ट कर्मचार्‍यांना ठाकरे यांनी दिले. काही विषारी नागोबांनीच कर्मचार्‍यांमध्ये आमच्याबद्दल विष फेरल्याचे सांगत बेस्ट कर्मचारी कृति समितीवर ठाकरे यांनी निशाना साधला.

इलेक्ट्रिक बसची वैशिष्टये
पर्यावरण पूरक, वातानुकुलित, आवाजविरहित, 31 प्रवासी क्षमता, मोबाईल चार्जिंग पॉईण्ट, आपातकालीन बटण,सीसीटीव्ही कॅमेरे, महिला,दिव्यांगांसाठी राखीव सीट,क्लच रहित.

- Advertisement -

आज पासून धावणार एसी बस

बेस्टने प्रवाशांसाठी अ‍ॅपची निर्मिती केलेली आहे.यामध्ये बसमार्ग, बसची वेळ, बस थांब्यांविषयीची सर्व माहिती अंतर्भूत आहे.तसेच बेस्टमध्ये दाखल झालेल्या 10 इलेक्ट्रिक बसमध्ये 6 एसी तर 4 नॉन एसी बसेस आहेत. या बसेस मंगळवारपासून बसमार्ग क्रमांक 302 राणी लक्ष्मीबाई चौक (सायन) ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड) पर्यंत धावणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -