घरमुंबईराम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नये - उद्धव ठाकरे

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नये – उद्धव ठाकरे

Subscribe

भाजपचे आमदार राम कदम यांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ती हीनवृत्ती आहे. माता भगिनीचा अवमान करणाऱ्या कदमांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमा दरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होत चालली आहे. राम कदम यांना यापुढे कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. वांद्राच्या रंगशारदा सभागृहात उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली.

राम कदमांवर निलंबनाची कारवाई करा

मुलीने विरोध केला तर तिला पळवून आणून तुम्हाला देऊ असं वक्तव्य राम कदम यांनी केले होते. उद्धव ठाकरे यांनी या वक्तव्यावरुन राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माता-भगिनींचा अपमान सहन करणार केला जाणार नाही. राम कदमांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे. राम कदम, श्रीपाद छिंदम आणि प्रशांत परिचारक हे तिघे एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करा आणि यापुढे कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये असे देखील त्यांनी म्हटले आहे. भाजपचे बेटी बढाओ, बेटी पढाओ हे अभियान नसून त्यांनी बेटी भगाओ अभियान सुरु केले असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

हार्दिकने उपोषण सोडावे

हार्दिक पटेल याला फोन केला होता. हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आरक्षणसाठी उपोषण सुरू केले आहे. त्याच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. त्यांनी उपोषण सोडावे असे मी त्याला सांगितले असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. उपोषण कोणा पुढे करायचं ज्याचाकडे संवेदना आहेत. तरच उपोषणाचा फायदा आहे. गुजरात आणि समाजाला तुझी गरज आहे. अतिरेकी आणि पाकिस्तांशी बोलण्यापेक्षा देशातील तरुणांशी संवाद करून प्रश्न सोडवे असा टोला देखील उध्दव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

पुरावे असतील तर सादर करा

सनातनवर आरोपपत्र दाखल करावे. पुरावे असतील तर लवकर सादर करावे, असे मत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. शहरी नक्षलवाद आणि सनातन याबद्दल नुसते आरोप करू नका तर पुरावे सादर करा. हिंदू दहशतवाद या सरकारच्या काळात बोलला जात असेल तर ते दुर्देव आहे. हिंदू नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद अशी भूतं नको असे देखील त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मोदी सरकारची नोटबंदी फसली

नोटबंदी फसली असून याची जबाबदारी कोण घेणार? मृत्यूच्या शेयेवर रुपया आहे याची सरकार जबाबदारी घेणार का असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला आहे. गरज पडली तर पुन्हा नोटबंदी लावू असे आरबीआय पुन्हा सांगत आहे हे जनता सहन करणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

हे वाचलंत का –

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राम कदम यांच्याविरोधात पोलीस स्थानकात ठिय्या
‘राम नव्हे रावण’, मनसेची घाटकोपरमध्ये पोस्टरबाजी!
बेताल वक्तव्य राम कदमांना भोवणार? पक्षाने मागवला खुलासा!
अहो राम कदम, महिलांबद्दल हे काय बोलून बसलात?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -