घरमुंबई'आम्ही रक्ताशी बांधिल आहोत; तुमच्यातील भेसळ तपासून पाहा'

‘आम्ही रक्ताशी बांधिल आहोत; तुमच्यातील भेसळ तपासून पाहा’

Subscribe

वीमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचा मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मोर्चाला टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. मुंबई महाराष्ट्रात सामील व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी देखील रक्त सांडले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या रक्ताशी बांधिल आहोत. ज्याचं अन्न आम्ही खातो त्याच्यासाठी जागतो. त्यामुळे आधी तुमच्या रक्तामधील भेसड तपासून पाहा’, अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. वीमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विश्वासघाताच्या विरोधात शिवसेनेने आज मुंबईत विराट मोर्चा काढला. या मोर्चेत उपस्थितांना संबोधित करताना शिवसैनिकांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यासोबतच या मोर्चेमागील उद्धेश देखील त्यांनी सांगितले आहेत. या मोर्चाच्या माध्यामातून शिवसेनेने वीमा कंपन्यांना १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. पंधरा दिवसांत सर्व प्रकरणं पूर्ण करा, अन्यथा आजच्या मोर्चापेक्षा जास्त बोलका आणि आक्रमक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

हेही वाचा – ‘पुनर्विकासासाठी ठोस कायदा करा’; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisement -

‘मोर्चाला स्टंट म्हणणारे नालायक’

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या वीमा कंपन्यांविरोधील मोर्चाला स्टंटबाजी म्हटली होती. अशोक चव्हाणांच्या याच वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेनेच्या मोर्चाला स्टंट म्हणणारे नालाईक आहेत. नालायकांना अध्यक्ष मिळत नाही आणि आम्हाला विचारताहेत. काही जण विचारताहेत मोर्चा कशासाठी? आम्ही काय करतो, हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यासोबतच आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आलो आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. देशाच्या सीमेवर रक्षण करणारी मुले देखील शेतकऱ्यांचीच आहेत. देशाचे पोट भरण्यासाठी शेतकरी शेतात राबतो आणि देशाच्या संरक्षणासाठी स्वत:चा पोटचा मुलगा सीमेवर पाठवतो. जो देशाला जगवण्यासाठी ऐवढी मोठी जबाबदारी घेतो, त्याची आपण जबाबदारी घेऊ शकत नाहीत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा – पीक विमा कंपन्याविरोधात शिवसेना आक्रमक | इशारा मोर्चा

- Advertisement -

शिवसैनिकांच्या हातातील मशाल धगधगती ठेवणार

‘मुंबईसाठी शेतकरी आणि कामगारांचे योगदान फारव मोठे आहे. हुतात्मा चौकात कामगाराच्या हातात मशाल असणारा पुतळा आहे. ती मशाल अजूनही धगधगती आहे. त्या मशालीला आम्ही विजू देणार नाही. त्यासाठी मी शिवसेनिकांच्या हातात मशाल देईल आणि ही मशाल धगधगती राहील’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा बँकांना देखील इशारा 

शिवसेनेने या मोर्चात बोलताना वीमा कंपन्यांसह बँकानाही १५ दिवसांची मुदत दिली आहे. पंधरा दिवसांत सर्व प्रकरण पूर्ण करण्याचे ठाकरे म्हणाले आहेत. अन्यता पुढचे आंदोलन आक्रमक असेल असा इशारा त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंनी बँक कंपन्यांकडे हिशोब मागितला आहे. कर्जमाफीमध्ये लाखो दिले गेले मात्र ते पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि त्याचा हिशाोबही द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी भारती एक्सा वीमा कंपनीला पाठवले पत्र

शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारती एक्सा कंपनीला पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांना वीमा कंपन्यांचा बदला मिळावा, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -