घरमुंबईशिस्तीचे वळण राजांना लागत आहे; सामनातून उदयनराजेंवर टीका

शिस्तीचे वळण राजांना लागत आहे; सामनातून उदयनराजेंवर टीका

Subscribe

साताऱ्याचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे १३ वे वशंज उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश करत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये देखील सहभाग नोंदवला. मात्र आता उदयनराजे भोसले यांच्या या भाजपा प्रवेशावर शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली आहे. शिस्त, तत्व, संस्कार, नितीमत्ता आणि साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे आणि इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपाच्या शिस्तीत बसत नाहीत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आणि चंद्रकांत पाटील यांनी याची कल्पना सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल, अशी टीका करत उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर सामनातून टीका करण्यात आली आहे.

काय आहे अग्रलेखात

एवढंच नाही तर उदयनराजे यांनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आर्शिवादाने भाजपचा रस्ता पकडला आणि भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. त्यामुळे शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अशी टीका देखील सामनातून करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचे उदयनराजे यांनी ईव्हीएमबाबत घेतलेली भूमिका आणि आता त्यांचे बदलेले मत यावर देखील सामनातून टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना जेरीस आणले होते. एरव्ही तीन-चार लाखांच्या मतांनी जिकणारे राजे यावेळी दम खात जिंकले, अशी टीका देखील करण्यात आले आहे. एवढंच नाही तर उदयनराजे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते व साताऱ्यातील तरुण वर्गात त्यांचा वावर आहे. उदयनराजे यांना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील, असे भाजपाचे गणित आहे. पण शिवराय हे फक्त एकाच जातीचे नव्हते तर सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळेच १३ वे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल, अशी टीका देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

…तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -