खोटारड्यांशी चर्चा नाही; मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे

सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपाकडून केला गेला

Mumbai
Uddhav Thackeray

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बरेच दिवस झाले तरी नवं सरकार स्थापन का झाले नाही तसेच नवा मुख्यमंत्री का होऊ शकला नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावर झालेल्या पत्रकार परिषदत घेत सांगितली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनवर पत्रकार परिषद घेतली.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच…

‘आमचं काय ठरलं होतं याला सर्व साक्षी आहेत. लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही.’, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खोटारडेपणाचा आरोप दुर्दैवी

‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांचे उदाहरण देत माझ्यावर खोटारडेपणाचा आरोप केला मात्र सर्व जनतेला माहित आहे नेमकं कोण खोटं बोलतंय…’, असे बोलत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.

तसेच, ‘अमित शाह आणि कंपनीविरोधात अविश्वास आहे असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करत इतकेच नाही तर मला खोटं ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. मी खोटेपणा केलेला नाही, भाजपा खोटेपणा करत आहे. सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपाने केला आहे. मी दिलेला शब्द फिरवलेला नाही. मातोश्रीवर जेव्हा अमित शाह आले होते तेव्हा जे काही ठरले होतं ते देवेंद्र फडणवीस यांना माहित असतानाही ते मला खोटे ठरवत आहेत, असे बोलत उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here