घरमुंबईशिवसेनेला पटकणारा कोणी पैदा झाला नाही - उद्धव ठाकरे

शिवसेनेला पटकणारा कोणी पैदा झाला नाही – उद्धव ठाकरे

Subscribe

लक्षात ठेवा, लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली तर तुमचं सिहासन जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबईच्या वरळीमध्ये सध्या स्थानिय लोकाधिकार समिती महाअधिवेशन सुरु आहे. या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, सुभाष देसाई, अनिल देसाई आदी राजकीय नेते उपस्थित आहेत. कार्यक्रमादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून  स्थानिक लोकाधिकाच्या कार्यकर्त्यांना भेटावं असा विचार मनात येत होता. अनेक वर्षे आमचा एकत्र संवाद झालेला नाही. या स्टेडीअम मध्ये कुस्त्या व्हायच्या पण शिवसेनेला पटकणारा कोणी पैदा झाला नाही. ही आमची भगवी लाट आहे
आम्हाला कुणी लेचे पेचे समजू नये. लोकाधिकारचा मावळा हातात घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय परतत नाही.
पुढची सर्व वर्ष आपली असणार आहे. माझ्या देशाचे काय होणार हा प्रश्न सध्या कुणाला पडलेला नाही. मला मतदानाच्या निकालापेक्षा माझ्या देशाचे काय होईल याची चिंता आहे. शेतकऱ्याला प्रमाण पत्र मिळालं पण कर्ज मिळालं नाही, हे मी उघड केल्यानंतर ४ ते ५ तासात असा काय दणका बसला की मुंबईमधून हलचाली झाल्या आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले.

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ- अधिवेशनामध्ये मार्गदर्शनपर भाषण केले. LIVE!

Posted by ShivSena on Saturday, January 12, 2019

- Advertisement -

देश मजबूत हवा

एकवेळ सरकार मजबूर नसले तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे. मात्र, इथे मजबूत म्हणवणारे सरकार छाताडावर बसत असेल तर त्याचे काय करावे? निवडणुका तोंडावर आल्यानंतर मतं मागितली जातात. सध्या एकंदरच जो देशाचा प्रवास सुरु आहे तो विचित्र आहे. नुसता भ्रम निर्माण केला जात आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी लोक वणवण करत आहेत. लोकांच्या पायातून चालून चालून रक्त येऊ लागले आहे. लक्षात ठेवा, लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली तर तुमचं सिहासन जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही.

निवडणुकीसाठी राम मंदिराचा मुद्दा घेतला

आतापर्यंत राम मंदिरच्या मुद्द्यावर संगक्यात जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत. होय, मी निवडणुकासाठी राम मंदिरचा मुद्दा घेतला हे जाहीरपणे सांगतो. मात्र, दुसऱ्याचे भांड फोडण्यासाठी मी राम मंदिरचा मुद्दा घेतला आहे.
हे विष्णूचे अवतार पण राम मंदिर बांधू शकत नाही. काँग्रेस आड येते असे हे सांगतात पण राम मंदिरच्या मुद्द्यावर कशी अडथळा आणते हे सांगा. आपली युती राम मंदिरच्या मुद्द्यावर झाली होती. राम मंदिर मला हवा..माझ्यासोबत तुमच्याही सर्व नेत्यांना व्यासपिठावर आणा. राम मंदिराला विरोध करणारे पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन तुम्ही कसे मंदिर बांधणार ?

- Advertisement -

वणवा पेटवणारी ठिणगी विझतेय

राम मंदिर हा देखील १५ लाखांसारखा जुमला आहे का? राम राज्याचा आदर्श हवा म्हणून आम्हाला राम मंदिर हवं आहे. मी अयोध्येत गेलो तेव्हा तिथली लोक आदराने बघत होती. बाळासाहेबांचा मुलगा अयोध्येत आला म्हणजे हा नक्की राम मंदिर बांधेल, असा विश्वास तिथल्या जनतेला वाटतो आहे. पण तुमच्या कामामध्ये राम आहे कुठे आहे? आतापर्यंत पंतप्रधानांनी केलेल्या चुकांमुळे पराभव झाला आहे. काँग्रेस राम मंदिराच्या आड कशी येते ते सांगा. काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताही झालेला नाहीये इथकी जबरदस्त शिक्षा जनतेने त्यांना दिली होती. राम मंदिराला विरोध करणारे सोबती घेऊन राम मंदिर कसे बांधणार? नितीश कुमार, रामविलास पासवान यांच्यासारखे राम मंदिराला विरोध करणारे सोबती घेऊन राम मंदिर कसे बांधणार? रामाचा पत्ता नाही आणि रामराज्य आहे सांगताय ? राम मंदिराचाही जुमला करायला लागला तर तुमच्या कामामध्ये राम राहिला कुठे ? वणवा पेटवणारी ठिणगी विझत चालली आहे.

चाकरमानी हा अभिमानी होऊ द्या

आगामी निवडणूक फक्त तुमच्या-आमच्या नाही तर ही निवडणूक महाराष्ट्र आणि देशाच्या भवितव्याची आहे. निवडणुका देव देश आणि धर्मासाठी लढल्या गेल्या पाहिजेत. जो पक्ष यासाठी निवडणुका लढेल तो पक्ष विजयी होईल. धनगर समाजाचं अजून कोणी ऐकूनच घेत नाही. ८ लाखांपर्यंतचे उत्पन्न असणारे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांना आयकर (इन्कम टॅक्स) माफ करा. हे केलं तर मोदीजी तुमची छाती ५६ इंची नाही तर २५६ इंचांची आहे, हे मी मान्य करेन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -