घरमुंबईअखेर उद्धव ठाकरे यांची सभा रस्त्यावरच...

अखेर उद्धव ठाकरे यांची सभा रस्त्यावरच…

Subscribe

अखेर सत्ताधारी शिवसेनेने पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयासमोरच उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मिळवली आहे.

मैदाने आणि रस्ते राजकीय सभांसाठी उपलब्ध होणार नसल्याने ठाण्यातील प्रचार सभांच्या अस्तित्त्वावर फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस आघाडी दोन्ही बाजूंकडून पर्यायी जागांचा शोध सुरू होता. अखेर सत्ताधारी शिवसेनेने पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयासमोरच उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मिळवली आहे. भर रस्त्यात प्रचारसभा न घेण्याचे महापालिकेचे धोरण असताना या सभेला कशी परवानगी देण्यात आली, असा प्रश्न शहरातील जागृक नागरिक विचारत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ठाण्यात मैदाने आणि रस्त्यावर राजकीय प्रचार करण्यास बंदी आहे.

रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी, २९ एप्रिल रोजी मुंबई-ठाण्यात मतदान होणार आहे. त्याचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. सर्व साधारणपणे अखेरच्या आठवड्यात मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा होतात. मात्र ठाणे शहरातील प्रचारसभा घ्यायच्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला मात्र महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भात आम्ही नियमांच्या आत राहूनच सभेसाठी परवानगी दिल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील जागृक नागरिकांनी मात्र शिवसेनेच्या सभेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारीच जर अशा प्रकारे कायद्यााच्या पळवाटा शोधून नियम मोडणार असतील. तर न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -