घरमुंबईशिवरायांच्या उंच पुतळ्यासाठी विधानसभेत युनिटी व्हावी

शिवरायांच्या उंच पुतळ्यासाठी विधानसभेत युनिटी व्हावी

Subscribe

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. दुष्काळ, आरक्षण यावरुन हे आरक्षण वादळी ठरणार यात वादच नाही. मात्र सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून आणखी एका विषयाला तोंड फोडले आहे. ‘गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा जगात सगळ्यात उंच व्हावा, यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटण्यात आली. सरकारचे हे कृत्य अंत्यत कोत्या, विकृत मनाचे लक्षण असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘युनिटी’चे दर्शन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देण्यात आला आहे. “जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा व्हावा अशी मोदींची इच्छा असेलही. हा पुतळा आज अंतराळातून दिसतो त्याचे कौतुक आहे, पण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा व प्राण आहेत. ते सदैव राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही व शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे श्रीमान फडणवीस, तुम्हीही ठणकावून सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!”, असे अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

“शिवरायांचा पुतळा हा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा भारी आणि जास्त उंचीचाच व्हायला हवा व त्यासाठी फक्त फडणवीस सरकारने नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी एकत्र यायला हवे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यासाठी त्यावेळी सत्ताधारी, विरोधकांची एकजूट झाली व त्यातूनच भव्य असे हुतात्मा स्मारक उभे राहिले. शिवरायांच्या भव्य स्मारकासाठी अशी एकजूट व्हावी.”, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -