घरमुंबईस्वत: उद्धव ठाकरेच ट्रॅफिकमध्ये अडकतात तेव्हा...!

स्वत: उद्धव ठाकरेच ट्रॅफिकमध्ये अडकतात तेव्हा…!

Subscribe

ठाण्यातील सभेसाठी येताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाहतूक कोंडीमुळे चांगलाच खोळंबा झाला आहे. त्यांचे तब्बल २ तास वाये गेले. मात्र असे असताना देखील त्याने मौन वर्थ पाळले असल्याचे समोर आले आहे.

कल्याणमधील सभा आटोपून ठाण्यातील सभेसाठी येताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाहतूक कोंडीत अडकले. रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे त्यांचा दोन तासांचा खोळंबा झाला. या प्रसंगावरुन ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे प्रवासात काय हाल होतात, त्याचा अनुभव त्यांनी घेतला. मात्र ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी अवस्था असल्याने त्यांनी याविषयी बोलणेच टाळले.

वाहतूक कोंडीमुळे सभेला उशीर

ठाणे महापालिका मुख्यालयासमोर साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. मात्र ते सव्वानऊ वाजता सभेच्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत सर्व वक्त्यांची भाषणे झाली होती. दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उशिरा येत असल्याची माहिती उपस्थित प्रेक्षकांमध्येही पोहोचली. त्यामुळे सभेत बोलायला उभे राहिल्यानंतर उद्धव ठाकरे नागरिकांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र जणू काही घडलेच नाही, अशा थाटात उद्धव ठाकरे यांनी वाहतूक कोंडीविषयी चकार शब्द देखील काढला नाही. ठाण्यापासून दिल्लीपर्यंत सत्तेत सहभागी असल्यानेच उद्धव ठाकरे याविषयी काही बोलले नाहीत, अशी उघड चर्चा नागरिक सभेनंतर करीत होते. खरेतर नागरिकांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी बोलायला हवे होते, अशाही भावना बऱ्याच लोकांनी त्यावेळी व्यक्त केल्या.

- Advertisement -

आव्हाडांनी मागितली माफी

उद्धव ठाकरे हे कल्याणहून ठाण्यात सभेसाठी येताना दोन तास वाहतुक कोंडीत अडकले. यामुळे त्यांना सभेला यायला उशीर झाला. सेनेच्या शिलेदारांनी शहराची काय वाट लावली आहे. हे त्यांच्या लक्षात आले असेलच पण, त्यांच्या भाषणात याचा उल्लेखही त्यांनी केला नाही. तरीही, आमच्या ठाण्यात येणारे उद्धव ठाकरे वाहतूक कोंडीत अडकल्याने आम्हीच त्यांची माफी मागतो, अशी मार्मिक टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी केली आहे.


वाचा – मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर

- Advertisement -

वाचा – अखेर उद्धव ठाकरे यांची सभा रस्त्यावरच…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -