घरमुंबईउद्धव ठाकरे यांची किसन नगर शाखेला भेट

उद्धव ठाकरे यांची किसन नगर शाखेला भेट

Subscribe

बाळासाहेब ठाकरेंनंतर वागळे इस्टेटमध्ये पहिल्यांदाच सभा,आज पालकमंत्री असलेलेएकनाथ शिंदे तत्कालीन शाखाप्रमुख

ठाण्यातील किसन नगर शाखेला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, रेपाळे आणि ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. एके काळी स्वतः एकनाथ शिंदे शाखाप्रमुख असलेल्या या शाखेच्या रजिस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या नावाची नोंदही केली. हा क्षण उपस्थित शिवसैनिकांना भावनिक करून गेला.

शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी ठाण्यात आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी किसननगर येथील शिवसेना शाखेला भेट दिली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना नेते व कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातील शिवसेना उमेदवार एकनाथ शिंदे यांनी शाखाप्रमुख असताना या शाखेची स्थापना केली होती. या शाखेला प्रथमच उद्धवजी ठाकरे यांनी भेट दिल्यामुळे शिवसैनिक हरखून गेले होते.

- Advertisement -

ठाकरे यांनी शाखेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मनोभावे दर्शन घेतले आणि तिथे अभ्यागतांसाठी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये त्यांनी अभिप्रायही लिहिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वागळे इस्टेट भागात 1992 साली जाहीर सभा झाली होती. त्यानंतर प्रथमच उद्धवजींची सभा वागळे इस्टेट भागात होत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘बाळासाहेबांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिघे यांनी 1981 मध्ये आपली शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली.

त्यानंतर सर्व सहकार्‍यांसह मिळून अडीच-तीन वर्षांनी 1984 मध्ये किसननगर येथे शाखा बांधली. किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे बांधलेल्या या शाखेच्या माध्यमातून शिवसेना या भागात रुजली. या शाखेला उद्धवसाहेबांनी भेट देणे, हा आमचा मोठा सन्मान आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -