घरमुंबईउद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर

Subscribe

शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असताना चिंताग्रस्त शेतकऱ्यांवर दिलासा देण्य़ास आजचा नाशिक, औरंगाबाद या दौऱ्याचे आयोजन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक तसेच औरंगाबाद दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे पीक विमा केंद्रांना भेट देणार आहे. या भेटीच्या वेळी शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. संपुर्ण राज्यांमध्ये सध्या दुष्काळाची झळ लागत असताना अद्यापही मान्सूचे आगमन झालेले दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असताना चिंताग्रस्त शेतकऱ्यांवर दिलासा देण्यास आजचा नाशिक, औरंगाबाद या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे.

पीक विमा केंद्राची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार

यावेळी, नाशिकमधील नांदगाव येथील शिवसेनेने सुरु केलेल्या पीक विमा केंद्राला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. या दौऱ्यावर असताना उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, स्थानिक शिवसेना नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहे. नाशिकच्या दौऱ्यावर जाण्यापुर्वी ते औरंगाबाद येथील लासूर भागात असलेल्या पीक विमा केंद्राची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

 विरोधकांचा आरोप लगावला टोला

महाराष्ट्रावर दुष्काळाचे गंभीर सावट असताना मात्र त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. दुष्काळ निवारणासाठी सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यांवर दुष्काळाच्या संकटाचा सामना सर्वच राजकीय पक्षांच्या केला पाहिजे. सरकार तर काम करते आहेच, पण विरोधी पक्ष, दानशूर लोक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनीच सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत. त्यामुळे टीका करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात काय करता येईल याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -