घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वामुळे भाजपची कोंडी

उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वामुळे भाजपची कोंडी

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ५२ व्या दसरा मेळाव्यात शिवसेनेची भूमिका माडताना भाजपची आगामी निवडणुकांमध्ये कोंडी करण्याचे स्पष्ट संकेत दिले. प्रचंड गर्दीचा उल्लेख करत हे तुमचं प्रेम आहे, माझे काही नाही, ही सर्व शिवसेनाप्रमुख आणि माँ साहेबांची पुण्याई आहे, अशी सुरुवात करत शिवसेना पक्षप्रमुखांनी भाषणाला सुरुवात केली. हिंदू मेलेला नाही, जागा आहे, हे या दसरा मेळाव्याने दाखवून दिले आहे. संघसुद्धा आता कान टोचतो आहे, आम्हाला टोचणं बिचणं जमत नाही आम्ही थेट बोलतो.जो कारभार देशात आणि राज्यात सुरू आहे, ते लोकांना आवडत नाही. मग मी बोलू नको का? कितीवेळा नारे द्यायचे? एकदा सांगून कळत नाही? अशा शब्दात भाजपवर टीका केली.

धनुष्य बाणाशिवाय रावण दहन करता येत नाही. रावण तर दरवर्षी उभा आहेच, पण राम मंदिर उभं राहत नाही, ही खरी खंत आहे. कोण किती वाकडे झाले तरी त्यांना सरळ करण्याची ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आज दुष्काळाची स्थिती गंभीर आहे,कर्नाटकातही दुष्काळ आहे. आमचे सरकार अभ्यास करत आहे. तर जुन्या नियमांचा अधार घेत कर्नाटकने दुष्काळ जाहीरही करून टाकला. कोणाची वाट पाहायची? दुष्काळ जाहीर करण्यासाठी समिती नेमता, पण नोटाबंदी-पेट्रोल दरवाढ एका रात्रीत होते. तुम्ही कोणालाच विश्वासात घेत नाहीत. तुम्ही प्रचार करा, जिंकून या पण त्यानंतर महागाई रोखा, असे आव्हानच उध्दव ठाकरेंनी दिले. शिर्डीत येता ना मग दुष्काळी भागात जा, थापा मारू नका, त्यांना काही तरी देऊन जा असे उध्दव म्हणाले.

- Advertisement -

२०१४ सालची हवा आता राहिली नाही, त्या हवेमध्ये सुद्धा मी तुमच्या सोबतीने टक्कर दिली, हा अश्वमेध माझ्या महाराष्ट्राने रोखला आहे. कोण किती वक्री झाले तरी त्यांना सरळ करण्याची ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आम्हाला बोलायला बंदी केली तर माईक बंद झाल्यानंतर देखील देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदूत्वाचा आवाज पोहोचेल.कोणाबरोबर युद्धबंदी केली होती? रमझान आले की युध्दबंदी जाहीर होते. मग आमच्या सणावेळीच आवाज का दाबला जातो, अशी विचारणा त्यांनी केली. सावरकर असते तर पाकिस्तानचे नाव समुळ नष्ट झाले असते. कश्मीर पेटला आहे, जर वल्लभभाई असते तर कश्मीरचा प्रश्न राहिला नसता, असे उध्दव म्हणाले.

‘देशीबल’ वाढवा

उध्दव यांचे भाषण सुरू असताना दूरवरून आवाज.. आवाज.. अशा घोषणा दिल्या जात होत्या. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी थोडं ‘देशीबल’ वाढवा, असे सांगत हिंदूच्या सणांवर घातल्या जाणार्‍या बंदीची उल्लेख उध्दव ठाकरेंनी केला. नवरात्री-गणपतीत आवाज बंदी होते.हे कोणाचे सरकार आहे, असा जाहीर सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

हा कसला विष्णू अवतार?

भाजपच्या प्रवक्त्याने विष्णूच्या अवताराचा उल्लेख उध्दव ठाकरेंनी केला. विष्णूचा 11 वा अवतार तुमच्या सोबत आहे. तरी तुम्हाला महागाई रोखता येत नाही. मग सत्तेत का आहात? मग का रोखू शकत नाही महागाई, अशी विचारणा त्यांनी केली. तेलाच्या किमती रोखण आमच्या हातात नाही, या केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या या वक्तव्याची उध्दव ठाकरेंनी जोरदार खिचाई केली.

पंतप्रधान अयोध्येत का गेले नाहीत?

25 नोव्हेंबरला मी अयोध्येत जाणार, आणि तिथून ‘तुम्ही पंतप्रधान अयोध्येत का गेले नाहीत’, हे विचारण आहे, असे उध्दव म्हणाले. राम मंदिर बांधा, नाही तर तो ही जुमला म्हणून जाहीर करा, मग बघा आम्ही काय करतो. मी आता अयोध्येला जाणार आहे.मला सरसंघचालकांचे अभिनंदन करावसे वाटते. शिवसेनेचा विचार आज संघाने सुद्धा मान्य केला आहे. पण खोटे बोलून जनतेला फसवत असाल तर एक दिवस हा ज्वालामुखी फुटेल. पहिल्यांदा मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येतोय. पण त्यानंतर आम्ही तमाम हिंदूंना एकत्र घेऊन राम मंदिर बांधू. राममंदिर तुम्ही उभारू शकत नाही.

याला मी निर्लजपणा म्हणतो

मी सांगतो लोकसभेत तुम्ही 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव घेऊन आलात तर तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहतो. किती वर्ष झाली सत्ता येऊन पण 370 कलम का रद्द करत नाही? तुम्ही स्पष्ट वक्ते असाल तर मोदींना सांगा आम्ही ही वचनं दिली होती. गडकरी आश्वासने विसरत असतील तर याला मी निर्लज्जपणा म्हणतो. किती विसरणार आहात. अच्छेदिनबाबत विचारले की मग तोंडे लपवावी लागतात. हे दुर्देव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -