घरताज्या घडामोडीआमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची बाधा

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची बाधा

Subscribe

उल्हासनगरमधील आमदार डॉ. बालाजी किणीकर हे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.

कोरोनाचा फैलाव राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असून आता आमदार देखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. उल्हासनगरमधील एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उल्हासनगरमधील आमदार डॉ. बालाजी किणीकर हे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. त्यांना मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डॉ. किणीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन घशातील स्वॅब कलेक्शनची रॅपिट टेस्ट करून घेतली. त्यात कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले, असे सांगितल्यानंतर अधिवेशनात जाणे योग्य नसल्याचा विचार करून डॉ. बालाजी किणीकर मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले जात आहे.

- Advertisement -

राज्यात २३,४४६ नव्या रुग्णांची नोंद

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २३ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,००,७१५ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,६१,४३२ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – Corona In Mumbai: २४ तासांत १,३६७ रूग्णांना डिस्चार्ज; ३८ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -