घरमुंबईवयोवृध्द महिलेच्या बांगड्या चोरणारी महिला गजाआड

वयोवृध्द महिलेच्या बांगड्या चोरणारी महिला गजाआड

Subscribe

एका चोरट्या महिलेने वयोवृध्द महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या जबरीने खेचून त्या रिक्षातून पलायन केल्याची घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

एका चोरट्या महिलेने वयोवृध्द महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या जबरीने खेचून त्या रिक्षातून पलायन केल्याची घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी संगिता ग्यानबा ब्राह्मणे चोरट्या महिलेला अटक केली आहे. उल्हासनगर कॅम्प ३ येथील १७ सेक्शन परिसरातील सदगुरू अपार्टमेंटमध्ये लाजवंती गोविंदराम पहीलाजानी (वय ६५) ही वयोवृध्द महिला राहते. त्यांना कॅम्प ५ येथील भाटिया चौक संतोषी माता मंदीर येथे आठवड्याभरापूर्वी देवदर्शनासाठी गेली होती. त्यासाठी त्यांनी १७ सेक्शन येथून एक रिक्षा पकडली. त्या रिक्षात एक अनोळखी महिला बसलेली होती. लाजवंती ह्या भाटिया चौक उल्हासनगर कॅम्प ५ येथे उतरल्या. त्यावेळी लाजवंती यांच्यासोबत रिक्षात बसलेली ती अनोळखी महिला देखील उतरली. तीने लाजवंती यांना मंदीरात सोडते असे बोलत त्यांना एका गल्लीत नेले आणि त्यांच्या हातातील एक-एक तोळयाच्या दोन सोन्याच्या बांगडया सुमारे ३० हजार रूपये किंमतीच्या जबरीने खेचून पळ काढला होता.

घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल

या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात त्या अनोळखी महिलेसह त्या रिक्षाचालकाविरूध्द झिरो नंबरने गुन्हा दाखल करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खातीब यांच्यावर सोपवली. यांच्या पथकातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हेमंत पाटील, पोलीस नाईक विनोद कामडी, पोलीस हवालदार संजय सुर्वे, पोलीस नाईक अनिल ठाकूर, पोलीस नाईक प्रवीण पाटील, महिला पोलीस हवालदार छाया चौपडे यांनी १७ सेक्शन ते भाटिया चौक परिसरातील १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी चोरी करणारी महिला हि शांतीनगर परिसरात राहणारी संगिता ब्राह्मणे असल्याचे निष्पन्न झाल्यावर तिला अटक केली. तिच्याकडून चोरलेल्या दोन बांगड्या हस्तगत केल्या आहेत. तिला न्यायालयात हजार केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -