गाडीला कट मारल्याने उल्हासनगरमध्ये तरुणाची हत्या

उल्हासनगरच्या सम्राट अशोक नगरमध्ये शुल्लक कारणामुळे तरुणाची हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतर गुंडांनी परिसरामध्ये राडा केला. उभ्या असलेल्या १२ गाड्यांची तोडफोड केली.

Ulhasnagar
Ulhasnagar murder case
उल्हासनगर हत्या प्रकरण

उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बाईकला कट मारल्याच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री उल्हासनगच्या कॅम ३ मधील सम्राट अशोक नगरमध्ये ही घटना घडली आहे. नवीन चौधरी या तरुणाची नाव आहे. नवीनच्या हत्येनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.

अशी घडली घटना

सम्राट अशोकनगरमध्ये राहणाऱ्या नवीन चौधरी याची निर्घृण हत्या करण्यात आली. नवीन चौधरी हा शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांचा पुतण्या होता. गाडीला कट मारला म्हणून नवीनची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर गुंडांनी परिसरामध्ये तलवारी घेऊन राडा केला. बाईक आणि कारच्या काचा फोडून तोडफोड केली. त्यामुळे या घटनेनंतर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. तक्रार करुनही पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेतली नाही असा स्थानिकांनी आरोप केला आहे. मात्र, काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here