घरमुंबईक्षुल्लक कारणावरून तिकीट काउंटरची तोडफोड

क्षुल्लक कारणावरून तिकीट काउंटरची तोडफोड

Subscribe

उल्हासनगर रेल्वे स्थानकात तिकीट काउंटरची तोडफोड करण्यात आली होती. क्षुल्लक कारणावरून मद्यधुंद प्रवाशी निरप्पा सोनार यांनी ही तोडफोड केली आहे.

एका मद्यधुंद रेल्वे प्रवाशाने तिकीट काउंटरवरील क्लार्कशी हुज्जत घालून काउंटरची तोडफोड केली आहे. तर या पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गुजरात मधील उमरगा येथे राहणारा निरप्पा सोनार(३५) हा त्याच्या पत्नीसह उल्हासनगरमधील नातेवाईकाकडे आला होता. निरप्पा काल दि. २१ रोजी गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पुन्हा त्याच्या गावी जाण्यास निघाला होता. यावेळी त्याने उल्हासनगर रेल्वे स्थानकातील पूर्व दिशेकडील तिकीट काउंटर क्रमांक ६ येथे बुकिंग क्लार्ककडे २ तिकिटे मागितली होती.

१० रुपयांच्या फरकावरून वाद 

दरम्यान, तिकीट दरातील १० रुपयांच्या फरकावरून मद्यधुंद सोनारने क्लार्कशी वाद घातला. तर त्यानंतर आरडाओरड करून काउंटरच्या काचा फोडल्या, या घटनेमुळे तिकीट काउंटर येथे एकच गोंधळ उडाला आणि सोनारने तेथून पळ काढला मात्र नागरिकांनी त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

- Advertisement -

या प्रकरणी अधिक तपास सुरू

रेल्वे पोलिसांनी आरोपी निरप्पा सोनार याच्याविरुद्ध रेल्वे ऍक्ट १५४, १४५, १४६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्याला १ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज दि.२२ रोजी रेल्वे प्रथम वर्ग दंडाधिकारी कळसकर यांच्यासमोर त्याला हजर केले होते तेव्हा सोनारने त्याचा गुन्हा कबूल केला. सोनारला ५ हजार दंड आकारणी करून जामिनिवर सोडण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे हे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -