घरमुंबईनवी मुंबईत प्रथमच अल्ट्रा थीन व्हाईट टॅपिंग काँक्रीट रस्ता

नवी मुंबईत प्रथमच अल्ट्रा थीन व्हाईट टॅपिंग काँक्रीट रस्ता

Subscribe

रस्त्यावर वारंवार पडणार्‍या खड्ड्यांपासून नागरिकांची सुटका व्हावी, तसेच खड्डेविरहित रस्ते बनावे व या रस्त्यांचे आयुष्य मोठे व्हावे यासाठी नवी मुंबई महापालिका आता एक पाऊल पुढे टाकत आहे. त्यासाठी नवी मुंबईत प्रथमच अल्ट्रा थीन व्हाईट टॅपिंग काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित रस्ते बनविण्यात येणार आहेत. याचा पहिला प्रयोग कोपरी गावात होणार आहे.
कमी खर्चिक रस्ता बनवायला कमी वेळ आणि जास्त आयुष्य या रस्त्याला असते. अल्ट्रा थीन व्हाईट टॅपिंग हा प्रयोग प्रथमत: अमेरिकेत 1918 साली करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो फारसा कोणी वापरात आणला नाही. मात्र, भारतात त्याच्यावर 1990 साली डॉ. विलास देशमुख यांनी शाळेत यशस्वी चाचणी केली आणि या कार्यपद्धतीला खर्‍या अर्थाने 2007 ला ठाण्यात रस्ता बनवून हा प्रयोग यशस्वी केला.

मार्च 2007 साली ठाण्यात घंटाळी येथे ठाण्याचे तत्कालीन नगर अभियंता के. डी. लाला यांच्या पुढाकाराने या तंत्रज्ञानावर आधारित रस्ता बनवून हा प्रयोग यशस्वी केला. त्यास नगरसेवक विलास सामंत यांनी आपला नगरसेवक निधी दिला. घंटाळी येथे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ठाण्यात बर्‍याच ठिकाणी या तंत्रज्ञानावर रस्ते बनविले जात आहेत. नवी मुंबईत गावठाण आणि झोपडपट्टीचा भाग बर्‍याच प्रमाणात आहे.या भागात बर्‍याच वेळा रस्ते खराब होतात; म्हणून नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी हे तंत्रज्ञ नवी मुंबईत वापरून दर्जेदार रस्ते बनविण्याचा संकल्प केला आहे. कमी खर्चिक आणि कमी वेळ हा रस्ता बनवायला लागतो. अधिक आयुष्य या रस्त्याला लाभते किमान 10 ते 15 वर्षे या रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. त्यामुळे दरवर्षी पडणारे खड्डे आणि ते खड्डे बुजवायला, तसेच त्या ठिकाणी वारंवार होणार्‍या खर्चापासून आता सुटका होणार आहे.

- Advertisement -

गावठाणातील वारंवार खराब होणार्‍या रस्त्यावर महापालिकेने हा उपाय शोधला आहे. अल्ट्रा थीन व्हाईट टॅपिंगने एकदा रस्ते बनविले की ते 15 ते 20 वर्षे खराब होत नाहीत. कोपरी गावात प्रयोगिक तत्त्वावर हा रस्ता बनवून प्रयोग करण्यात येणार आहे. तेथे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नवी मुंबईतील उर्वरित भागात अशाप्रकारे रस्ते बनविण्यात येणार आहेत.  डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -