घरमुंबईमुंबई महापालिका आश्रय योजनेतंर्गत बांधणार १३ हजार ८८७ घरे

मुंबई महापालिका आश्रय योजनेतंर्गत बांधणार १३ हजार ८८७ घरे

Subscribe

महापालिका सफाई कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी हाती घेतलेल्या आश्रय योजनेला तब्बल ११ वर्षे पूर्ण होत असून आता या योजनेला गती देण्यासाठी महापालिकेच्यावतीने व्यापक निर्णय घेतला जात आहे. या योजनेतंर्गत १३ हजार ८८७ घरे बांधण्यात येणार आहे.

महापालिका सफाई कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी हाती घेतलेल्या आश्रय योजनेला तब्बल ११ वर्षे पूर्ण होत असून आता या योजनेला गती देण्यासाठी महापालिकेच्यावतीने व्यापक निर्णय घेतला जात आहे. या योजनेतंर्गत १३ हजार ८८७ घरे बांधण्यात येणार आहे. यासाठी पूर्वी नियुक्त केलेल्या सल्लागाराकडून ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर यासाठी महापालिका प्रशासनाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट-पीएमसी) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमसीच्या नियुक्तीनंतर या योजनेला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या घरांसाठी १३ सप्टेंबर २००८ रोजी तत्कालीन सहआयुक्त व्ही. राधा यांनी आश्रय योजनेची घोषणा केली. ही घोषणा करता सफाई कामगारांना तीन वर्षांत घरे बांधू अशी घोषणा महापालिकेने केली होती. परंतू आज २०१९ उजाडले तरी गौतम नगर, राजवाडकर स्ट्रीट, वालपाखाडी आदी ठिकाणी केवळ संक्रमण शिबिरांचे बांधकाम वगळता कुठल्याही ठिकाणी याचे बांधकाम होवू शकले नाही. परंतु आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आश्रय योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रीया सुरु आहे. याबाबत निविदा काढण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

आश्रय योजनेतंर्गत बांधण्यात येणार्‍या सदनिका

  • शहर भागातील सदनिका – ७४२६
  • पश्चिम उपनगरांतील सदनिका – ३०२५
  • पूर्व उपनगरांतील सदनिका – ३३७६
  • एकूण – १३ ८२७

३८ ठिकाणी होणार सफाई कामगारांसाठी घरे

  • राजवाडकर स्ट्रीट/वालपाखाडी – ७४१ सदनिका
  • दादर गौतम नगर – ९२८ सदनिका
  • दादर कासारवाडी – ११९१
  • फलटन रोड-६४ टेनामेंट्स व इतर – ७४७
  • पी.जी.सोलंकी- शुक्लाजी स्ट्रीट – ८४४ सदनिका
  • आर्थर रोड – १०१६ सदनिका
  • प्रभादेवी/माहिम – ९१८

पश्चिम उपनगरे

हसनाबागलेन,यारी रोड,नायर रोड,जुहू गल्ली के/पश्चिम व एच/पश्चिम – १४००
मिठानगर – १०३४
जे.पी.नगर, आकुर्ली, बाभई नाका – ५९१

पूर्व उपनगरे

  • एम पूर्व व एम पश्चिम देवनार कॉलनी,सिंधी सोसायटी आणि इतर – ६१६
  • पी. एम. लोखंडेनगर – १८७४
  • चिरागनगर, विक्रोळीपाक साईट, लायन पार्क, आम्रपाली रोड गायकवाड नगर – ८८६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -