Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर मनोरंजन ….आणि निर्मला नागपाल बनल्या सरोज खान

….आणि निर्मला नागपाल बनल्या सरोज खान

Mumbai

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे कार्डियक अरेस्ट अटॅकमुळे मुंबईत निधन झाले. त्यांनी ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १७ जून रोजी श्वासाचा त्रास होत असल्याने त्यांना हॉस्टिपलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड १९ चाचणीदेखील करण्यात आली होती. त्यात त्यांना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तब्बल ५ दशकाहून अधिक काळ सिनेसृष्टीत योगदान दिलेल्या सरोज खान यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • फाळणीनंतर भारतात आलेल्या सरोज खान यांचे कुटुंबिय आले होते. सरोज खान यांचा जन्म १९४८ साली मुंबईत झाला. त्यांचे मूळ नाव निर्मला नागपाल होते. मात्र लग्नानंतर इस्लाम धर्म स्विकारल्यानंतर त्यांचे नाव सरोज खान झाले.

  • अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. नजराणा या चित्रपटात त्यांनी श्यामा ही भूमिका साकारली.

  • सुरूवातीच्या काळात नायिकेच्या मागे बॅक ग्राऊंड डान्सर म्हणून अनेक गाण्यांमध्ये सरोज खान यांना पाहिले जाऊ शकते. नूतन यांच्या निगाहे मिलाने को जी चाहता है…, तसेच मधुबाला यांच्या आईए मेहरबा… सारख्या अनेक गाण्यांमध्ये त्यांना पाहिले जाऊ शकते.

  • वयाच्या १३ व्या वर्षी सरोज खान यांनी आपल्यापेक्षा ३० वर्षांनी मोठ्या असलेल्या डान्स गुरू बी. सोहनलाल यांच्याशी विवाह केला. लग्नानंतरच त्यांनी इस्माल धर्म कबूल केल्यानंतर त्या सरोज खान झाल्या.

  • १९७४ साली गीता मेरा नाम चित्रपटात सरोज खान यांनी पहिल्यांदा नृत्यदिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर अनेक गाण्यांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शकाची भूमिका पार पाडली. मात्र १९८७ साली आलेल्या मि. इंडिया चित्रपटातील श्रीदेवीचे हवा हवाई गाण्याच्या नृत्यामुळे सरोज खान यांना पहिल्यांदा ओखळ मिळाली. पुढे त्यांनी अनेक हिट गाणी नृत्यशैलीसाठी दिल्या.

  • अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत हिट गाण्यांचा सिलसिला सरोज खान यांनी सुरू केला. धक धक करने लगा…., एक दो तीन…, तम्मा तम्मा लो गे…., चोली के पिछे क्या है…., डोला रे डोला…., तबाह हो गए… अशी अनेक सुपरहिट गाणी दोघींनी दिली आहेत.

  • सरोज खान यांना आतापर्यंत तीनदा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

हेही वाचा –

कोरोनाला रोखण्यासाठी अटीतटीची शर्थ